PREMANAND MAHARAJ DISCIPLE DEATH IN VRINDAVAN saam tv
देश विदेश

प्रेमानंद महाराजांच्या शिष्यानं उचललं टोकाचं पाऊल; गुप्तांगाला जखम अन् खोलीत ग्राइंडर आढळल्याने खळबळ

Premanand Maharaj Disciple Death: वृंदावनमधील आश्रमात प्रेमानंद महाराजांच्या दीक्षित शिष्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांकडून सीसीटीव्ही, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

वृंदावनमधील वाराहघाट परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतलेल्या 25 वर्षीय युवा साधूने चार मजली इमारतीवरून उडी घेतल्याची घटना समोर आली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपक पटेल उर्फ रसिक दुलारी शरण असे मृत साधूचे नाव आहे.

दीपक हा वाराहघाट परिसरातील गुरु कृपा कुंज आश्रमात राहत होता. हा आश्रम प्रेमानंद महाराजांच्या दीक्षित शिष्यांसाठी असल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी आश्रमाच्या सर्वात वरच्या मजल्यावरून दीपक खाली पडल्याने परिसरात खळबळ उडाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना दीपकच्या खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर आढळल्याची माहिती आहे. त्याच्या शरीरावर गंभीर दुखापत आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. ही दुखापत नेमकी कशी झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली पडताना दिसत असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्याने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, यासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

दोन वर्षांपासून वृंदावनमध्ये वास्तव्यास

दीपक पटेल हा मूळचा जबलपूरचा रहिवासी होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी तो वृंदावनमध्ये आला होता. धार्मिक प्रवृत्ती असलेल्या दीपकने प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्याचे नाव रसिक दुलारी शरण असे झाले. यापूर्वी त्याने नर्मदा परिक्रमा केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दीपकचे जबलपूरमध्ये मन रमत नव्हते. त्यामुळे तो वृंदावनमध्ये आला आणि त्यानंतर पुन्हा जबलपूरला परतला नाही. कुटुंबीयांशी त्याचा फारसा संपर्क होत नव्हता.

गुप्तांगाला जखम अन् प्रकरणात मोठा ट्विस्ट

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे उडी मारण्यापूर्वी त्याच्या गुप्तांगाला जखम झाली होती. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी दीपकच्या खोलीतून रक्ताने माखलेले एक ग्राइंडर जप्त केले असून, याचाच वापर करून गुप्तांग कापले असावे असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

Maharashtra News Live Update: कासच्या पर्यटनाला ‘लक्झरी टच’, साताऱ्यात २५ सुपरकार्सचा ताफा दाखल

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

SCROLL FOR NEXT