Crime News AI Photo
देश विदेश

Crime News: भयंकर! शौचालयाला जाताना गरोदर महिलेची वाट अडवली, अत्याचारानंतर धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं

Pregnant Woman Assaulted in Train: दोन पुरूषांनी चालत्या ट्रेनमध्ये चार महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केला. नंतर आरोपी पुरूषांनी तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं आहे.

Bhagyashree Kamble

चालत्या ट्रेनमध्ये दोन पुरूषांनी चार महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिला आरोपी पुरूषांनी चालत्या ट्रेनमधून फेकून दिलंय. ही धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. या भयानक घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी डीएमके यांच्यात राजकीय वाद निर्माण झालाय. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महिला आंध्र प्रदेशातील चित्तूरला जात होती. शुक्रवारी पहाटे कोइम्बतूर - तिरूपती इंटरसिटी एक्सप्रेसमधून महिला आणि आरोपी प्रवास करीत होती. एक्सप्रेस तिरुपत्तुर जिल्ह्यातील जोलारपेट्टई येथून जात होती. या दरम्यान, महिला वॉशरूमला गेली. वॉशरूमला जात असताना दोन पुरूषांनी तिच्यावर हल्ला केला. ती महिला मदतीसाठी ओरडत वॉशरूमच्या दिशेनं धावली. पण पुरूषांनी तिचा पाठलाग केला आणि महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर महिला मदतीसाठी आरडाओरडा करत असल्यामुळे तिला वेल्लोर जिल्ह्यातील केव्ही कुप्पमजवळ एक्सप्रेसमधून ढकलून दिलं. या घटनेमुळे तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे. यात अपघातात महिलेचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच महिलेच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. तिला जिल्हा सरकारी रूग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.

याप्रकरणी जोल्लारपेट्टई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच रेल्वे सरंक्षण दलाने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. या प्रकरणात हेमराज नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या माहितीनुसार, हेमराज हा गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT