ladkunwar morya Saam tv
देश विदेश

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

ladkunwar morya death : उत्तर प्रदेशात प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

जंगलात आढळला लोक गायिकेचा मृतदेह

हत्या केल्यानंतर मृतदेह जाळल्याचा पोलिसांना संशय

लोक गायिकेच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उल्दन पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगलातील नदीकाठी एका महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जंगलात आढळलेला मृतदेह लोक गायिका लाडकुंवर उर्फ लवली मौर्या यांचा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं.

प्राथमिक तपासानुसार, लोक गायिकेची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा सांगण्यात येत आहे. घटनास्थळी दारूच्या बाटल्या देखील आढळल्या आहेत. तसेच बीयरचे कॅन, जळालेला मोबाइल, संशयित कार आढळली. एक शेतकरी शेतीसाठी निघाला. त्यावेळी जंगलात धूर निघत असल्याचे दिसून आलं. त्याने जवळ जाऊन पाहिल्यानंतर एका महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. मृतदेहाचे हात-पाय जळलेल्या अवस्थेत होते. शरीराचा बहुतेक भाग जळलेल्या अवस्थेत होता.

घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. गावातील डॉ. जगदीश कुशवाह यांनी पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही तासांत फॉरेन्सिक टीम आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचून पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

घटनास्थळी पोलिसांना अनेक संशयित वस्तू आढळल्या. जंगलाजवळी शेतातही दारूच्या रिकाम्या बॉटल देखील दिसून आल्या. शेतात लाल रंगाची साडीचा तुकडा देखील सापडला. महिलेची काळ्या रंगाची चप्पल देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, महिलेला एका वाहनाने आणलं गेलं. तिची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्यात आला असावा.

महिलेची ओळख आणि पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर घटनास्थळी आढळलेल्या पुराव्याच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. जंगलात सापडेला मृतदेह ४५ वर्षीय लाडकुंवर उर्फ लवली मौर्या यांचा असल्याचे निश्चित झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा गोंधळ संपता संपेना! नागपुरच्या विद्यार्थ्याला दिलं 'अबू धाबी'चं केंद्र

Maharashtra News Live Update: शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा...

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसैनिक आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

धुळे हादरलं! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; थरारक व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT