पेपरफुटीच्या महाघोटाळ्यानंतर देशभरात नीटची फेरपरीक्षा होतेय. एकीकडे NTA कडून पारदर्शकता आणण्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे NTA चा अजब आणि अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. नागपूर, वर्धा किंवा भंडारा केंद्र मागणाऱ्या नागपूरच्या 'अब्दुल्ला' नावाच्या विद्यार्थ्याला NTA ने थेट यूएईमधील अबुधाबी परीक्षा केंद्र दिलं. त्यामुळे आता केंद्रामुळे परीक्षेपासून वंचित रहावं लागणार का या भीतीनं पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली...
साम टिव्हीनं ही बातमी समोर आणून शिक्षण व्यवस्थेला जाब विचारला... तर दुसरीकडे याप्रकरणानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी X पोस्टवर NTAसह शिक्षण व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केलाय...जी व्यवस्था देशातील मुलांना त्यांच्या स्वतःच्या शहरात परीक्षा केंद्र देऊ शकत नाही, पण त्यांना थेट परदेशात पाठवते, अशा व्यवस्थेला परीक्षा घेण्याचा कोणताही अधिकार नाही. हा आता शिक्षण व्यवस्थेचा भाग राहिलेला नसून संपूर्ण पिढीची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करणारा प्रकार आहे. हा मुलांच्या भविष्याशी चाललेला खेळ आहे. देशातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक संवेदनशील, जबाबदार आणि उत्तरदायी शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा प्राधिकरण मिळायलाच हवे आणि आम्ही ते मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान साम टीव्हीच्या बातमीनंतर NTA नेही X वर पोस्ट करत नागपुरातच त्या विद्यार्थ्याला केंद्र देणार असल्य़ाची माहिती दिलीय... तक्रारीचं निवारण करण्यात येतंय आणि योग्य पडताळणीनंतर पुढील काही तासांत उमेदवाराला नागपूरमधील केंद्रात सीट दिली जाईल. दरम्यान 'साम टीव्ही'च्या बातमीमुळे नागपूरच्या अब्दुल्लला अखेर न्याय मिळाला असून त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचलयं...मात्र, आधी पेपरफुटी आणि आता थेट परदेशातील परीक्षा केंद्र देण्याचा पराक्रम करणाऱ्या NTA च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.... मात्र उद्याची नीटची फेरपरिक्षा कुठल्याही घोटाळ्याशिवाय पार पडावी हीच अपेक्षा ..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.