Arvind Kejriwal x
देश विदेश

Politics : अरविंद केजरीवालांना मोठा झटका, आपच्या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Political News : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला झटका बसला आहे. पक्षातील मोठे नेते चेतन रावल राजीनामा देत आपमधून बाहेर पडले आहेत.

Yash Shirke

  • गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला झटका बसला आहे.

  • जेष्ठ नेते चेतन रावल यांनी पक्षातून राजीनामा देत आपची साथ सोडली

  • चेतन रावल हे टीव्ही अभिनेता आणि प्रमुख राजकीय नेते आहेत.

Aam Aadmi Party : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असताना आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आप पक्षाचे जेष्ठ नेते चेतन रावल यांनी अचानक पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे रावल यांनी म्हटले आहे. पण यामागे वेगळे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुजरातमधील आम आदमी पक्षाचे प्रमुख इशुदान गढवी यांच्याकडे चेतन रावल यांनी राजीनामापत्र दिले. काही वैयक्तिक कारणांमुळे तात्काळ आम आदमी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे राजीनामापत्रात नमूद केलेले आहे. चेतन रावल हे अहमदाबादमधील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी मनोरंजनसृष्टीतही काम केले आहे.

आपमध्ये सामील होण्याआधी चेतन रावल हे काँग्रेसमध्ये होते. २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. चेतन रावल हे तेव्हा अहमदाबाद शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस होते. चेतन रावल यांनी असारवा आणि खाडिया मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे.

चेतन रावल यांचे वडील प्रबोध रावल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गुजरातचे गृहमंत्रीपद देखील भूषवले आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत चेतन काँग्रेसमध्ये सक्रीय झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केला. आता त्यांनी आपमधूनही राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Condom: 'या' देशात आहे कंडोम विक्रीवर बंदी

Saturday Horoscope : ६ राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; शनिवारचा संपूर्ण दिवस जाणार कसा?

Cricketer Became Robber : दोन वर्ल्डकप खेळणारा क्रिकेटपटू बनला दरोडेखोर, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

SCROLL FOR NEXT