Pakistan Protest Saam Tv
देश विदेश

Pakistan: पाकिस्तानविरोधात PoKची जनता रस्त्यावर, जनरल मुनीरचे जनतेवर डायरसारखे अत्याचार

Pakistan Protest: पाकिस्तानमध्ये नागरिक आक्रमक झाले आहेत. जनरल मुनीर आणि पाकिस्तानच्या सरकारविरोधात त्यांनी आंदोलन सुरू आहे.

Priya More
  • पाकिस्तानमध्ये नागरिकांचे आंदोलन

  • रस्त्यावर उतरून नागरिकांचे सरकारविरोधात घोषणाबाजी

  • आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरून नागरिकांमध्ये नाराजी

  • आगामी निवडणुकांपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

रोहित कदम, साम टीव्ही

स्वतःच्या देशात दहशतवादाची पिलावळ पोसणाऱ्या पाकिस्तानला आता पीओकेतील जनताही दहशतवादी वाटू लागलीये. पाकिस्तानी सरकार आणि लष्करानं मिळून पीओकेत कसा जनरल डायरसारखा क्रूर अत्याचार सुरू केलाय? आणि पीओकेची जनता पाकिस्तानविरोधात कशी रस्त्यावर आलीय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलीय. पीओकेमध्ये भीषण हिंसाचार सुरू असल्याचं समोर आलंय. पीओकेतील आर्थिक आणि राजकीय मागण्यांसाठी लढणाऱ्या 'जॉईंट अवामी अॅक्शन कमिटी'(JAAC) या स्थानिक नागरिक हक्क संघटनेवर पाक सरकारनं दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातल्यानं पीओकेत मोठा हिंसाचार उसळलाय. त्यामुळे जनरल असीम मुनीर यांनी थेट लष्करी कारवाईचे आदेश दिल्यामुळे झालेल्या हिंसेत 30 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, 'जॉईंट अवामी अॅक्शन कमिटी'(JAAC)नं पाकिस्तानविरोधात आंदोलनाचं हत्यार का उपसलंय ते पाहा....

27 जुलैला पीओकेत विधानसभा निवडणुकीच्या 45 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी 12 जागा निर्वासितांसाठी आरक्षित ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं 9 जूनला आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, या नियोजित आंदोलनाच्या एक दिवस आधीच हा हिंसाचार घडला. इंटरनेट बंदी, वीज टंचाई, महागाई, बेरोजगारी, स्थानिक संसाधनांची होणारी लूट आणि राजकीय अन्याय या मुद्द्यांवरूनही नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. इतकंच नव्हे तर आपल्या संघटनेला 'दहशतवादी संघटना' घोषित करणे हा छळ असल्याचा आरोप जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं केलाय.

पीओकेतील जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातल्यानं पाकिस्तानी मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त केलीये. खरंतर, पाकिस्तानी सरकारनं पीओकेची अवस्था नरकापेक्षाही वाईट बनवलीये. हे कमी म्हणून की काय आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या पीओकेतील जनतेवर शाहबाज सरकारनं थेट बंदुका रोखल्या आहेत. त्यामुळे एकीकडे, देशात दहशतवाद्यांना पोसायचं आणि दुसरीकडे, पीओकेतल्या जनतेवर गोळ्या घालायच्या. यामुळे मात्र पाकचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचा जनरल डायरसारखा क्रूर चेहरा समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : या 3 गोष्टींवर खर्च करताना कधीही कंजूषी करू नका; अन्यथा आयुष्यभर राहाल मागे

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल

IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका; तस्करांकडून गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला

School Reopen: मोठी बातमी! राज्यातील शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर

Petrol Crisis: राज्यात पेट्रोलचा काळाबाजार! किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री, 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

SCROLL FOR NEXT