Andhra Pradesh  
देश विदेश

TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

Jogi Ramesh house attacked by TDP workers : मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधातील कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला आहे. गुंटूर आणि एनटीआर जिल्ह्यात हिंसाचार, जोगी रमेश यांच्या घरावर हल्ला आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

political tension in Andhra Pradesh after remarks against Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरुद्ध अपमानास्पद अन् वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील वातावरण तापलेय. मुख्यमंत्र्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुंटूरमध्ये तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला. इब्राहिमपट्टणम, एनटीआर जिल्ह्यातही तणावाची स्थिती कायम आहे. वायएसआरसीपी नेते आणि माजी मंत्री जोगी रमेश यांच्या घराची जमावाने तोडफोड केली अन् त्यानंतर आग लावली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आयटी मंत्री नारा लोकेश यांच्याविरुद्ध जोगी रमेश यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर आंध्र प्रदेशमधील वातावरण तापलेय. मागील ४८ तासांपासून आंध्र प्रदेश धगधगतोय.

माजी मंत्री जोगी रमेश यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) कार्यकर्त्यांनी जोगी रमेश यांच्या घरात तोडफोड केली अन् आग लावली. कार्यकर्त्यांनी घराच्या काही भागांना आग लावल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला.

मैलावरम, विजयवाडा पश्चिम, जी. कोंडूर आणि इब्राहिमपट्टनम येथील टीडीपी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले अन् आंदोलन सुरू केले आहे. टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून वायएसआरसीपी नेत्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लोकांचा रोष पाहून जोगी रमेश आधीच घराबाहेर पडले. घटनेच्या वेळी त्यांचे वडील जोगी मोहन राव, पत्नी शकुंतला देवी आणि धाकटा मुलगा रोहित घरी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करण्यात आली.

जोगी रमेश यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच वायएसआरसीपी नेते अन् समर्थक तात्काळ दाखल झाले. त्यामुळे इब्राहिमपट्टणमम्ये तणाव वाढला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण संघर्ष झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवले. त्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली. एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर केलेल्या विधनामुळे आंध्रप्रदेशमध्ये तणाव वाढलाय. दोन पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: जेवणाआधी पाणी पिणे की जेवणानंतर? चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Maharashtra News Live Update: NCERT च्या विरोधात साताऱ्यात एल्गार, छत्रपती घराण्याच्या वतीने काढण्यात आला मोर्चा

Bharat Taxi: ओला उबरला देणार टक्कर! 'भारत टॅक्सी' सेवा मुंबईत सुरु; किती भाडे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

SCROLL FOR NEXT