FIR FILED AGAINST BJP MLA YASHPAL SUVARNA OVER ALLEGED CONTROVERSIAL REMARKS AGAINST RAHUL GAND  Saam Tv
देश विदेश

Political News :"राहुल गांधी हे २४ तास ड्रग्सच्या नशेत असतात" भाजप आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Rahul Gandhi Political News : भाजप आमदार यशपाल सुवर्णा यांच्यावर राहुल गांधींविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाजप आमदार यशपाल सुवर्णा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उडुपी पोलिसांनी एफआयआर दाखल केला

  • काँग्रेस अध्यक्ष अशोक कुमार कोडवूर यांच्या तक्रारीनंतर बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला

  • राज्य सरकारने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनाला यश मिळालं असून या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाला अनेकांनी ट्रोल केले. अशातच आता काँग्रेस आणि सीजेपीविरोधात भाजप नेते आमदार यशपाल सुवर्णा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उडुपी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक कुमार कोडवूर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, केपीसीसीचे कार्याध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य मंजुनाथ भांडारी यांनी राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात यशपाल सुवर्णा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांची सर्व बाजूंनी चौकशी केली जात असून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

भांडारी यांनी आरोप केला की, भाजपच्या कार्यक्रमात सुवर्णा यांनी राहुल गांधी हे २४ तास ड्रग्सच्या नशेत असतात असं वक्तव्य केलं असून, "आम्ही राहुल गांधींचा वंश संपवू" असेही त्यांनी जाहीरपणे म्हटल्याचा दावा त्यांनी केला. या भाषणाचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उडुपीतील इतर भाजप आमदारांनी या वक्तव्याचा निषेध न केल्याबद्दलही भांडारी यांनी टीका केली. त्यांचे मौन हे अशा वक्तव्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधी आणि सीजेपी विरोधात केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याने आता संबंधित भाजप नेते आमदार यशपाल सुवर्णा यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 57, 192, 196(2), 351(2), 352 आणि 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT