Bihar Election News :  Saam tv
देश विदेश

Bihar Election : राजकारणात पुन्हा भूकंप; मुख्यमंत्र्यांकडून पक्षातील माजी मंत्र्यांसहित १६ बडे नेते निलंबित, कारण काय?

Bihar Election News : राजकारण पुन्हा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडून पक्षातील माजी मंत्र्यांसिहत १६ बडे नेते निलंबित केले.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षातील १६ वरिष्ठ नेत्यांना केलं निलंबित

निलंबित नेत्यांमध्ये माजी मंत्री, आमदार आणि माजी आमदारांचा समावेश आहे.

शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई

बिहार निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये राजकीय उडाली खळबळ

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावलाय. जनता दलाचे अध्यक्ष मु्ख्यमंत्री, नितीश कुमार यांनी रविवारी पुन्हा मोठी कारवाई केली. मुख्यमंत्र्यांनी आज आमदार गोपाल मंडल यांच्यासहित ५ जणांना निलंबित केलं. याबाबत जेडीयूचे प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी याबाबत पत्र जारी केलं.

जनता दल युनायटेड पक्षाकडून भागपूरचे गोपालपूरचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, माजी मंत्री हिमराज सिंह , माजी आमदार संजीव श्याम सिंह, माजी आमदार महेश्वर प्रसाद यादव आणि गायघाटचे प्रभात किरण यांना निलंबित करण्यात आलं आहे.

जनता दल युनायटेडने याआधी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी केल्याप्रकरणी ११ जणांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यात आता आणखी ५ जणांचा समावेश झाला आहे. त्यात माजी मंत्री, आमदार शैलेश कुमार यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. पक्षाने दोन दिवसांत १६ बड्या नेत्यांना निलंबित केलं आहे.

कोणाला पक्षातून निलंबित केलं?

शैलेश कुमार- माजी मंत्री, जमालपुर, मुंगेर

संजय प्रसाद, चकाई, जमुई

श्याम बहादुर सिंह, बडहरिया, सीवान

रणविजय सिंह, बड़हरा, भोजपुर

सुदर्शन कुमार, बरबीधा, शेखपुरा

अमर कुमार सिंह, साहेबपुर कमाल, बेगूसराय

डॉ. आसमा परवीन, महुआ, वैशाली

लब कुमार, नवीनगर, औरंगाबाद

आशा सुमन, कदवा, कटिहार.

दिव्यांशु भारद्वाज, मोतिहारी, पूर्वी चम्पारण.

विवेक शुक्ला, जिरादेई, सीवान

नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, गोपालपूर, भागलपूर

हिमराज सिंह, कदवा, कटिहार

महेश्वर प्रसाद यादव, गायघाट, मुजफ्फरपुर

प्रभात किरण, गायघाट, मुजफ्फरपूर

संजीव श्याम सिंह, गया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची निर्घृण हत्या, बायकोला संपवून नवऱ्याने केली आत्महत्या

Maharashtra News Live Update : शेगाव येथील चिंचोलीजवळ शेतातील चारा कुटाराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Long Hair Tips: 1 महिन्यातच केस दुपटीने वाढतील, रोज रात्री कांदा आणि नारळाचा 'हा' तेल लावा

जम्मू-श्रीनगर आता फक्त काही तासांत! वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, कसा असणार मार्ग आणि वैशिष्ट काय?

SCROLL FOR NEXT