Satara Doctor Case : साताऱ्यात भाड्याच्या घरात राहणारी डॉक्टर महिला लॉजवर राहायला का गेली? धक्कादायक माहिती समोर

Satara Doctor Case update : साताऱ्यातील डॉक्टर अचानक लॉजवर राहायला गेली होती. डॉक्टर महिला लॉजवर का गेली होती, याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Satara Doctor Case
Satara Doctor Case updateSaam tv
Published On
Summary

फलटणच्या डॉक्टर महिलेने लॉजवर आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेने हातावर आरोपींची नावे लिहिली होती

आरोपींमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरचा समावेश

डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात संबंध होते, पोलिसांची माहिती

साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. आरोपी प्रशांत बनकर याच्या वडिलांच्या घरात भाड्याने राहणारी डॉक्टर महिला अचानक लॉजवर का गेली, याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आरोपी प्रशांत बनकरच्या छळामुळे डॉक्टर महिलेने लॉजवर आत्महत्या केल्याचा आरोप आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर शेवटचा संदेश लिहिला. यात डॉक्टर महिलेने दोन्ही आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे. यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने ४ वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपही केला.

Satara Doctor Case
Satara News : साताऱ्याच्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं कारण आलं समोर

गेल्या काही महिन्यांपासून प्रशांत बनकर याच्या वडिलांच्या घरात भाड्याने राहणारी डॉक्टर महिला अचानक लॉजवर राहायला गेली होती. डॉक्टरच्या फ्लॅटला लॉक लावल्याने अनर्थ घडला होता. लॉक लावण्यावरून वाद झाल्यानंतर प्रशांत बनकरने तू आमच्या फ्लॅटवर राहायचे नाही आणि यायचे नाही, असे सांगितले. ऐनवेळी जायचं कुठं म्हणून डॉक्टर महिलेने लॉजवर राहायचा निर्णय घेतला. यादरम्यान मानसिक तणावात असणाऱ्या डॉक्टर महिलेने याविषयी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरला वारंवार कॉल केले होते.

Satara Doctor Case
Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

डॉक्टर महिला आणि बनकर यांच्यात संबंध, पोलिसांची माहिती

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती दिली. डॉक्टर महिलेने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. पीडित डॉक्टर आणि बनकर यांच्यात संबंध होते. या दोघांचे संबंध होते. त्यांच्यात नंतर वितुष्ट आलं होतं. पीएसआय बदनेचा काय सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. चॅटिंगमधून बनकर आणि डॉक्ट यांच्यात संबंध होते हे निष्पन्न झालं आहे. पोस्टमॉर्टममध्ये मृत्यू हा गळफास केल्यामुळेच झाला आहे. प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरात त्या मेडिकल ऑफिसर म्हणून राहत होत्या. प्रशांत हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो पुण्यात होता'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com