lok sabha security breach Update in Marathi  Twitter
देश विदेश

Parliament Attack Update: संसद सुरक्षा भंग प्रकरणात ६ जणांची नावे समोर; चौघे पोलिसांच्या ताब्यात, दोघे फरार

lok sabha security breach Update in Marathi :संसद सुरक्षा भंग प्रकरणातून नवीन अपडेट समोर आली आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण ६ जण सामील असल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

lok sabha security breach Update:

संसद सुरक्षा भंग प्रकरणातून नवीन अपडेट समोर आली आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण ६ जण सामील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, संसद सुरक्षा भंग प्रकरणात 6 जण सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. हे सहा जण गुरुग्राममध्ये रात्री थांबले होते. तिथे या सहा जणांची बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विक्रमच्या घरीच हे सहा जण थांबले होते. तिथेच या सहा जणांनी सर्व कट रचला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकरणातील सहा जणांची नावे समोर

पोलिसांना काही लोकांचे मोबाईल सापडले नाहीत, ज्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींच्या मोबाईल जप्तीतून बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात, त्यामुळे पथक त्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात सागर, विक्रम, ललित, अमोल, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत.

पोलिसांकडून चौकशी सुरु

सुरक्षा संसद भंग प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची चौकशी अद्यापही सुरूच आहे. आरोपी चौघेही रात्री एकत्र राहिल्याची माहिती आहे. गुरुग्राममधील एका ठिकाणी एकत्र राहिले. ज्यांच्या घरी राहिले होते, त्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. हे सर्वच आरोपी ३-४ दिवसांपूर्वी दिल्लीत आल्याची माहिती आहे.

अमोल शिंदे पोलीस चौकशीत सकारात्मक उत्तर देत नसल्याचीही माहिती हाती आली आहे. आज आरोपींची चौकशी करून उद्या गुरुवारी सकाळी कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT