VishnuDeo Sai: छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्रीपदाची शप्पथ; शपथविधी सोहळ्याला PM मोदी आणि अमित शाह उपस्थित

Chhattisgarh CM :आज विष्णुदेव साय यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री आहेत. याचसोबत अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली.
VishnuDeo Sai
VishnuDeo SaiSaam Tv
Published On

Chhattisgarh CM VishnuDeo Sai

आज विष्णुदेव साय यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री आहेत. याचसोबत अरुण साव आणि विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये निवडणुका पार पडल्या. निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपने विजय प्राप्त करुन नवीन चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने या राज्यातील नवीन मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केली आहे. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री विष्णुदेव साय

भाजपने छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांची निवड केली. ते एक आदिवासी नेते आहे. विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री आहेत. विष्णुदेव साय यांनी छत्तीसगडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सरगुजा संभाग येथून कुनकुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकून आले. या प्रदेशात भाजपने १४ जागांवर बाजी मारली आहे.

VishnuDeo Sai
Vasundara Raje-Shivraj Chouhan Explainer: राजस्थान, मध्य प्रदेशातील धक्कातंत्रानंतर वसुंधरा राजे- शिवराज सिंह यांचे काय होणार?

अरुण साव भाजपचे प्रदेशाध्यक्ष

छत्तीसगडमध्ये अरुण साव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते ओबीसी समुदायाचे आहेत. त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे नेते थानेश्वर साहू यांना ४५ हजार मतांनी पराभव केला होता.

विजय शर्मा

छत्तीसगडमध्ये विजय शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजय शर्मा आणि कॉंग्रेसचे मंत्री मोहम्मद अकबर यांना ३९ हजार मतांनी पराभव केला होता.

VishnuDeo Sai
Parliament Security : १२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संसदेची सुरक्षा कशी असते? Y,Z आणि Z Plusपेक्षा किती वेगळी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com