Mehul Choksi Belgium arrest  
देश विदेश

Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला अटक, बेल्जियममध्ये ठोकल्या बेड्या

Mehul Choksi Belgium arrest : १३,५०० कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली. CBI च्या सूचनेनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहत. भारत त्याच्या प्रत्यर्पणासाठी पावलं उचलतोय.

Namdeo Kumbhar

PNB scam mastermind Mehul Choksi Arrested : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयच्या माहितीच्या आधारावर बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला रविवारी अटक केली. भारत आता चोक्सी याच्या प्रत्यर्पणासाठी बेल्जियम सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे सांगण्या येत आहे. (PNB bank fraud 13500 crore)

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबीमधून १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा (PNB Scam) केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच २०१८ मध्ये चोक्सीने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर तो अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून बसला होता. बेल्जियममधील अँटवर्प येथे पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. सीबीआयच्या माहितीच्या आधारावर रविवारी बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत.

सीबीआय आणि ईडी यांच्याकडून मागील अनेक वर्षांपासून चोक्सीचा शोध घेतला जात होता. बेल्जियम पोलिसांनी सीबीआयच्या सूचनेनुसार चोक्सी याला अटक केल्याची माहिती मिळत आहे. चोक्सी याच्या प्रत्यर्पण प्रक्रियेसाठी भारताने पावले उचलली आहेत. चोक्सीच्या वकिलांनी यापूर्वी त्याच्या प्रकृतीचे कारण देत प्रत्यर्पणाला विरोध केला होता. मात्र, आता अटकेमुळे भारतात आणता येणार आहे.

मेहुल चोक्सी याने केलेल्या १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे पीएनबीला मोठा आर्थिक फटका बसला होता. चोक्सीच्या अटकेमुळे बँक घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाईला अधिक वेग येणार आहे. चोक्सी याला भारतात कधी आणले जाणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

SCROLL FOR NEXT