PNB Recruitment 2024 Saam Tv
देश विदेश

PNB Recruitment 2024: सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत २७०० पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी ४ दिवस बाकी

Punjab National Bank : या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ३० जून २०२४ पासून सुरू झाली असून १४ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

Priya More

बँकेत नोकरी (Bank Job)मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने अपरेंटिसच्या एकूण २७०० रिक्त पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ३० जून २०२४ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी तात्काळ अर्ज करावा. पीएनबीची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२४ आहे.

पात्रता -

पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा -

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. तसेच, सर्व आरक्षित उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. ओबीसीप्रमाणेच ३ वर्षांची सूट आणि एससी-एसटीसाठी ५ वर्षांची सूट मिळेल.

अर्ज फी -

या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्व श्रेणींसाठी वेगवेगळे अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

सामान्य - ९४४ रुपये

ओबीसी - ९४४ रुपये

महिला - ७०८ रुपये

एससी - ७०८ रुपये

एसटी - ७०८ रुपये

दिव्यांग - ४७२ रुपये

परीक्षा -

या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. यासाठी सीबीटी पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. २८ जुलै २०२४ रोजी परीक्षा घेतली जाईल.

असा करा अर्ज -

- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट pnbindia.in ला भेट द्या.

- मुख्यपृष्ठावर PNB अपरेंटिस भरती २०२४ वर क्लिक करा.

- आवश्यक असलेली सर्व माहिती भरा.

- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

- अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

Arjun Kapoor: समांथाच्या कवितेवर अर्जुन कपूरची हटके रिॲक्शन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT