नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तास्थापनाकडे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. रविवारी नरेंद्र मोदी हे रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने संसदेत आयोजित केलेल्या संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी उपस्थित प्रमुख नेत्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी ते बाळासाहेब ठाकरेपर्यंत एनडीएचा राजकीय इतिहास सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला तुम्ही नवीन दायित्व दिलं. यासाठी तुमचा आभारी आहे. तुम्ही लोकांनी नेतेपदी निवडलं. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा हा वारसा दिला. आपल्यातील विश्वासाचा सेतू मजबूत आहे. आपलं अतूट नातं हे विश्वासाच्या आधारावर आहे. हेच मोठं भांडवलं आहे. यासाठी जेवढे आभार मानू, तेवढे कमी आहे'.
'फार कमी लोक या गोष्टीची चर्चा करतात. देशात एनडीएला २२ राज्यात लोकसेवा करण्याची संधी दिली. आपली युती ही भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. देशात पाहिलं तर, देशातील १० राज्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. १० आदिवासीबहुल राज्यापैकी ७ राज्यात एनडीए प्रतिनिधित्व करत आहे. देशात गोवा, ईशान्य भारतात ख्रिश्चन लोक राहतात. आम्ही त्या राज्यातही एनडीएच्या माध्यमातून लोकसेवा करत आहोत,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
'आपल्याला बहुमत मिळालं आहे. मी अनेकादा म्हटलं की, सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. पण देश चालवण्यासाठी सर्वमत गरजेचं असतं. एनडीएला तीन दशक झाले आहेत. ही सामान्य बाब नाही. मी एकेकाळी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या रुपात एनडीएचा सदस्य होतो. एनडीएसोबत ३० वर्षांपासून नातं आहे. हे संपूर्ण यशस्वी युती आहे. या युतीत ३० वर्षांत तीन टर्म यशस्वीरित्या पूर्ण केले. ही युती चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहे, असेही मोदी म्हणाले.
'एनडीए राष्ट्र प्रथम या भावनेने एकत्र आली आहेत. एनडीए ही नैसर्गिक युती आहे. अटल बिहारी वाजपेयी, प्रकाशसिंह बादल, बाळासाहेब ठाकरे या नेत्यांनी रोपट्याचं वटवृक्ष केलं आहे. आम्हाला या नेत्यांचा वारसा आहे. मागील १० वर्षात देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला,असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.