Narendra Modi : स्वागत है भाई स्वागत है! मोदींचं आगमन होताच खासदारांची जोरदार घोषणाबाजी; जल्लोषाचा VIDEO पाहाच

Narendra Modi Parliament Welcome Video : पंतप्रधान मोदी यांचं संसदेत आगमन होताच खासदारांनी टाळ्यांचा कडकडाटासह त्यांचं स्वागत केलं. तसेच "स्वागत है भाई स्वागत है" अशा जोरदार घोषणा देखील दिल्या.
Narendra Modi Parliament Welcome Video
Narendra Modi Parliament Welcome Video Saam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA आघाडीने पुन्हा एकदा बहुमत मिळवलं. ५४३ पैकी तब्बल २९३ जागांवर एनडीएचे खासदार निवडून आले. निवडणुकीत विरोधी पक्षाला २४१ जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान, बहुमताचा आकडा गाठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Narendra Modi Parliament Welcome Video
Politics News : नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

यासाठी आज जुन्या संसद भवनात एनडीएमधील घटकपक्षांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचं संसदेत आगमन होताच खासदारांनी टाळ्यांचा कडकडाटासह त्यांचं स्वागत केलं. तसेच "स्वागत है भाई स्वागत है" अशा जोरदार घोषणा देखील दिल्या.

खासदारांचं आपल्यावरील प्रेम पाहून नरेंद्र मोदी चांगलेच भारावून गेले होते. त्यांनी राज्यघटनेला वंदन करून खासदारांचे आभार मानले. मोदींनी एनडीएमधील दोन महत्वांचे नेते नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना आपल्या शेजारील खुर्चीवरच स्थान दिले. तसेच त्यांच्यासोबत निवांत गप्पाही मारल्या.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी खासदारांमध्ये चांगलाच उत्साह भरला होता. १० वर्षांपूर्वी भारत देश उदासीन होता. त्यावेळी काहीही होत नव्हते. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे. गरिबांना ताकद मिळाली, युवकांच्या आशांना पंख फुटले, असं जेपी नड्डा म्हणाले.

दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी मोदी यांचे नाव या पदासाठी सर्वोत्तम आहे. मंत्रिमंडळात असताना मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांची दुरदृष्टी पाहिलेली आहे. त्यांचे काम संपूर्ण देशाने पाहिले आहे. एनडीएच्या सरकारने दहा वर्षे मोदी यांच्या नेतृत्त्वात काम केले, त्याची भरतच नव्हे तर संपूर्ण जगात प्रशंसा होत आहे, असं म्हणत मोदींची प्रशंसा केली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आज मोदी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

Narendra Modi Parliament Welcome Video
Raj Thackeray MNS News : मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली? नितीन सरदेसाईंनी सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com