PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi: ब्रेकिंग! नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ केव्हा घेणार? नितीश कुमारांनी तारीख सांगितली

PM Modi Oath Cermony Nitish Kumar Announced Date: लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळालं. नरेंद्र मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत.

Rohini Gudaghe

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीचं सरकार आता स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. ९ जूनला म्हणजेच रविवारी राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पीएम मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. रविवारी ९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता मोदींचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक झाली. यावेळी राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला अमित शाह, एचडी कुमारस्वामी, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिलं आहे.

या निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर आता ५४३ सदस्यांसह एनडीएकडे लोकसभेत चांगले बहुमत आहे. यावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रस्ताव १४० कोटी जनतेच्या मनातील आहे, अशा भावना अमित शाहंनी व्यक्त केल्या आहेत. संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदींची निवड झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी नरेंद्र मोदींना मिळाली आहे.

यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यावर्षी भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही. त्यामुळे भाजप मित्र पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करत आहे. तर पंतप्रधान २०१४ मध्ये भाजपला २७७ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएच्यासंसदीय पक्षाच्या बैठकी संसदीय पक्ष नेते म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनुमोदन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

SCROLL FOR NEXT