Narendra Modi: लोकसभा निकालानंतर महायुतीची खलबतं; विधानसभेत चुका सुधारून एकत्रित काम करा, PM मोदींनी दिले निर्देश

Narendra Modi Meeting With Maharashtra BJP Mahayuti Leaders: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर मोदींनी पराभवाची कारणे जाणून घेतली आहेत. त्यांनी विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
 नरेंद्र मोदी
Narendra ModiSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

लोकसभा निकालानंतर महायुतीची खलबतं पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीला सतरा तर भाजपला फक्त सात जागांवर यश मिळालं आहे. राज्यात मविआला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये धुसफुस दिसून येत आहे. भाजप नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील पराभवाची कारणे जाणुन घेतली आहेत.

राज्यांतील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही पराभवाची काही प्रमुख कारणं असल्याची माहिती राज्यातील नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना दिली आहे. तर राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा देखील अडचण ठरत असल्याची माहिती महायुतीकडून (Mahayuti) समोर येत आहेत.

परंतु लोकसभेतील पराभवामुळे राज्यात भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये राज्यात काहीसं नाराजीचं वातावरण आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे, तर राज्यात मंत्रीपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) निर्देश दिले आहेत.

 नरेंद्र मोदी
PM Modi: लोकसभेतील विजयाबद्दल मोदींचं जगभरातून कौतुक; इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या?

संपूर्ण देशाचा विचार करता लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीवर (Lok Sabha Election 2024) आहे. देशात एनडीला बहुमत मिळालं आहे. इंडिया आघाडीने विरोधक असणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मंत्रिपद वाटपाच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. शिंदे सेनेला दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक देखील पार पडली आहे.

 नरेंद्र मोदी
PM Modi: राजकारणात मोठ्या घडामोडी, PM मोदी राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात; पडद्यामागे काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com