पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राजस्थानच्या दौऱ्यावर होते. राजस्थानमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेहलोत सरकारवर जोरदार टीका केली. 'गेहलोत सरकारने राजस्थानचं नुकसान केलंय. गेहलोत गेल्या पाच वर्षांपासून खुर्ची वाचण्याचं काम करत आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. मात्र, या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद करणार नसल्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथील रॅलीला हजेरी लावली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, 'गहलोत सरकारने काही योजना लागू केल्या आहेत. मात्र, आमचं सरकार आल्यानंतरही कोणत्याही योजना रोखल्या जाणार नाहीत. नरेंद्र मोदी यांची हमी म्हणजे हमी पूर्ण करण्याची हमी आहे'.
'राजस्थानात ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांनी गरिबांच्या पैशांची लूट केली आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होईल. या लोकांनी मोदींना कितीही अपशब्द वापरले तरी भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई होईलच, असेही मोदी म्हणाले.
गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती टीका
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकी केली होती. गेहलोत म्हणाले, मोदींनी अनेक आश्वासन दिले आहेत. त्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचंही आश्वासन द्यावे. त्यांनी २५ लाख रुपयांचं आरोग्य विमाही द्यावा'.
त्यानंतर मोदी म्हणाले, 'लोकांच्या जनहिताच्या योजना बंद करण्यात येणार नाही. मात्र, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लाल यांच्या हत्याकांडाचीही उल्लेख केला. तसेत महिला आरक्षणावरूनही काँग्रेसवरही निशाणा साधला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.