PM Narendra Modi Ganesh Puja At CJI DY Chandrachud Residence:  Saamtv
देश विदेश

PM Modi Ganpati Puja: सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी! मराठमोळ्या पद्धतीने केलं गणरायाचे पूजन; पाहा VIDEO

PM Narendra Modi Ganesh Puja At CJI DY Chandrachud Residence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीमधील घरच्या गणरायाच्या दर्शनाला हजेरी लावली. यावेळी पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाची आरती केली,

Gangappa Pujari

PM Modi Visit CJI D.Y Chandrachud Home: देशभरात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी, राजकीय नेतेमंडळींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले असून सर्वत्र गणपती उत्सवाची धामधुम पाहायला मिळत आहे. अशातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीमधील घरच्या गणरायाच्या दर्शनाला हजेरी लावली. यावेळी पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाची आरती केली, ज्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील घरी गणपती पूजनला उपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीजेआय डी. वाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नीसह गणपतीची आरती आणि पूजा करताना दिसले. सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेल्या या गणपती पुजनावेळी पंतप्रधानांनी केलेला पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

या संपूर्ण भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी गणपती बाप्पाच्या पूजनात सहभागी होताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींचे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नीने स्वागत केले. नंतर पंतप्रधानांनी गणपतीची आरती केली. यावेळी पीएम मोदींसोबत डी वाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास चंद्रचूडही उपस्थित होत्या. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा पारंपारिक पोशाख म्हणजेच पांढरी टोपी घातली होती.

संजय राऊतांची टीका..

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनासाठी हजेरी लावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या भेटीवरुन विरोधक आक्रमक झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. संविधानच्या मंदिराला आग लागली,

१) ईव्हीएमला क्लीन चीट

2) महाराष्ट्रात 3 वर्षांपासून सुरू असलेल्या घटनाविरोधी सरकारच्या सुनावणीला तारीख पे तारीख..

3) पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात सुमोटो हस्तक्षेप पण महाराष्ट्र बलात्कार प्रकरणाचा उल्लेख नाही.

4) दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जामिनावर तारीख पे तारीख... हे सर्व का होत आहे? समजून घ्या, भारत माता चिरंजीव हो!!!! असे म्हणत राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT