Maharashtra Assembly Election : महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा, २८८ जागा लढवण्याची केली घोषणा; महायुतीला बसणार फटका?

Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवसणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागांवर लढणार असल्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली आहे.
महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा, २८८ जागा लढवण्याची केली घोषणा; महायुतीला बसणार फटका?
Mahadev JankarSaam Tv
Published On

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. यातच सर्वच पक्ष आतापासूनच कमला लागले आहेत. यातच महायुतीची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले आहेत की, ''येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा लढवणार. आम्ही महायुतीत आहे की, नाही हेच आम्हाला माहीत नसून त्यामुळे प्रत्येकाने आपापली तयारी केली पाहिजे,'' असं ते म्हणाले आहेत.

महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा, २८८ जागा लढवण्याची केली घोषणा; महायुतीला बसणार फटका?
Ambarnath News: अंबरनाथ नगरपालिकेत १०० कोटींचा भ्रष्टाचार? शरद पवार गटाचा गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय समाज पक्षाचा अकोला इथं आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यात प्रदेशाध्यक्षांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येकानं आपापली तयारी केली पाहिजे. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे, असं महादेव जानकर म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्ष भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. असं असलं तरी अद्याप या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षाचे नेते जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी सातत्याने बैठका घेत आहेत. यातच काही नेत्यांनी तर थेट आपला पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार आहे, याचा आकडाच जाहीर केला आहे.

महादेव जानकरांचा स्वबळाचा नारा, २८८ जागा लढवण्याची केली घोषणा; महायुतीला बसणार फटका?
Ambarnath News: अंबरनाथ नगरपालिकेत १०० कोटींचा भ्रष्टाचार? शरद पवार गटाचा गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

यातच भाजपनं मिशन १२५ चा नारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १२५ जागा जिंकण्यासाठी भाजपनं थेट १६० जागा लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जर भाजपने १६० जागा लढवल्या तर महायुतीत १२८ जागा राहतील. यातच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी ६४-६४ जागांवर निवडणूक लढवायला लागू शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. यातच कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com