Narendra Modi Saam tv
देश विदेश

Narendra Modi : काँग्रेसकडून होणारी लूट जिंदगी के साथ भी, बाद भी...'; वारसा करावरून PM नरेंद्र मोदींचा प्रहार

Narendra Modi Speech :वारसा करावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसची लूट जीवन जगतानाही आणि नंतरही सुरु आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वारसा कराचा मुद्दा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा करावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. वारसा करावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसकडून होणारी लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..., अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. ते छत्तीसगडमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या सरगुजा महारॅलीमध्ये उपस्थिती दर्शवली. या महारॅलीत सरगुजा लोकसभा उमेदवार चिंतामणी महाराज यांच्या प्रचारार्थ हजेरी लावली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

'शाहीघराण्याचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबाबत भाष्य केलं. त्यांनी हा कर मध्यमवर्गीय हा कर अधिक लागला पाहिजे असं म्हटलं आहे. तर काँग्रेसने आणखी पुढे पाऊल टाकलं आहे. काँग्रेसचे म्हणणं आहे की, 'वारसा कर हा आई-वडिलांकडून मिळणाऱ्या संपत्तींवरही वारसा कर लावतील, असे ते म्हणाले.

'काँग्रेसकडून होणारी लूट ही जिंदगी के साथ आणि बाद भी... राहणार आहे. काँग्रेस तुमच्या वारसा कराचं ओझं लादत आहे. काँग्रेस पक्षाला ज्यांनी वडिलोपार्जिंत संपत्ती मानली, त्यांनी हा पक्ष त्यांचा मुलांना दिला. आता त्यांना वाटत आहे की, भारतीयांनी आता त्यांची संपत्ती मुलांना देऊ नये वाटत आहे, असे मोदी म्हणाले.

'काँग्रेस हिंसा पसरवण्याचं समर्थन करत आहे. त्यांना शहीद म्हणत आहे. काँग्रेसचा एक नेता दहशतीवाद्याच्या मृत्यूनंतरही अश्रू ढाळतो. यामुळे काँग्रेसने देशातील लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यांना फक्त तुमचं आरक्षण लुटायचं नाही तर त्यांचे इतर देखील कारनामे आहेत. काँग्रेसचा निश्चय चांगला नाही. त्यांचा निश्चय संविधानाला अनुसरून नाही. तुमच्या आरक्षणाचं फक्त भाजप संरक्षण करू शकते, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT