Rahul Gandhi In Amravati : यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात संविधानावरून घमासान सुरू झालंय. भाजप सत्तेत आलेत संविधानात बदलण्यात येईल, असं विधान भाजप खासदारांकडून वारंवार केलं जातं. यावरून राहुल गांधींनी भाजपला खडेबोल सुनावलेत. अमरावतीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याप्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते.
भाजपचे खासदार म्हणतात की, भाजप सत्तेत आलं तर आम्ही संविधान बदलून टाकू. याला उत्तर खणखणीत उत्तर देताना राहुल गांधी देशवाशीयांना ग्वाही दिली. कोणीच देशाचं संविधान बदलू शकत नाही. जो कोणी संविधान बदलण्याचा विचार करत असेल त्याला आम्ही बघून घेऊ, असा खणखणीत इशारा राहुल गांधींनी अमरावतीच्या सभेत दिलाय.
भाजप खासदारांच्या संविधान बदलाच्या विधानाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'मी महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला ग्वाही देतो, कोणीच आपल्या देशाचं संविधान संपवू शकत नाही. या लोकांनी संविधानाला काय समजलं हे माहिती नाही. संविधान हे गरिबांचा आवाज आहे. मागासवर्गीय लोकांचा आवाज म्हणजे संविधान. संविधान गरीब, मागासवर्गीय लोकांची शक्ती आहे. त्यामुळे कोण हे संविधान बदलतो ते आम्ही पाहून घेऊ असा, थेट इशारा राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय.
देशातील कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाने संविधानावर अतिक्रमण करण्याचीही पहिली घटना आहे. हे लोक संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे इंडिया आघाडी लोकशाही आणि संविधानाची संरक्षण करत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप, आरएसएस, लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.