Amit Shah: कॉंग्रेसचा पर्दाफाश झाला; वारसा कराच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा कॉंग्रेस नेत्यावर निशाणा

Amit Shah On Sam Pitroda Over Inheritance Tax: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबद्दल वक्तव्य केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पलटवार करत सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचं म्हटलं आहे.
Amit Shah On Sam Pitroda
Amit Shah On Sam PitrodaSaam Tv

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Congress Leader Sam Pitroda) यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचं गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. कॉंग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात सॅम पित्रोदा यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं ते म्हणाले आहेत. अमित शाह म्हणाले आहेत की, 'जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा संपूर्ण काँग्रेस, राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅकफूटवर आले होते. काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल, असा विश्वास अमित शाहंनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील मालमत्तेवरून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेच्या वारसा कराचा उल्लेख करताना म्हटलं आहे की, अमेरिकेमध्ये मालमत्तेचा ५५ टक्के भाग सरकार घेते. भारतातही संपत्तीचं समान वितरण व्हायला हवं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पलटवार करत सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचं म्हटलं आहे.

अमित शाह म्हणाले की, 'आज सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे उद्दिष्ट देशासमोर स्पष्ट झालं आहे. आधी त्यांच्या जाहीरनाम्यात 'सर्वेक्षणा'चा उल्लेख आहे. 'देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे' असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं होतं. आता त्याचा कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं अमित शाहंनी म्हटलं (Lok Sabha 2024) आहे.

अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा म्हणाले की, 55 टक्के संपत्ती सरकारी (Inheritance Tax) तिजोरीत जाते. आज काँग्रेसचं समोर आलं आहे, त्यांना लोकांची खाजगी मालमत्ता सरकारी तिजोरीत टाकायची आहे. ती अल्पसंख्याकांमध्ये वाटून द्यायची आहे. त्यांना देशातील जनतेच्या वैयक्तिक मालमत्तेचे सर्वेक्षण करायचं आहे. त्यांची संपत्ती सरकारी तिजोरीत ठेवायची आहे. सॅम पित्रोदा यांचं विधान जनतेने गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन अमित शाह यांनी केलं आहे.

Amit Shah On Sam Pitroda
Amit Shah: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रच घेऊ : अमित शाह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नुकतेच एका वक्तव्यात म्हटलं होतं की, निवडणुकीनंतर त्यांचं सरकार सत्तेवर आलं, तर सर्वेक्षण केलं जाईल. कोणाकडे किती मालमत्ता आहे, हे शोधून काढलं जाईल. सॅम पित्रोदा यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता त्यांनी अमेरिकेत वारसा कर आकारला जात असल्याचं सांगितलं. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल. त्यांच्या मृत्यूनंतर, 45 टक्के मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली जाते, तर 55 टक्के मालमत्ता सरकारची मालकी बनते, असं ते म्हणाले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे.

Amit Shah On Sam Pitroda
Amit Shah: ..तोपर्यंत CAAला हात लावू देणार नाही; अकोल्यात अमित शहांचं मोठं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com