Amit Shah: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रच घेऊ : अमित शाह

Amit Shah On One Nation One Election: एक देश, एक निवडणुकीबाबत भाजप नेते अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा आणि विधानसभा एकसोबत घेऊ, असं ते म्हणाले आहेत.
मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकसोबत घेऊ: अमित शाह
Amit Shah On One Nation One ElectionSaam Tv
Published On

Amit Shah On One Nation One Election:

एक देश, एक निवडणुकीबाबत भाजप नेते अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा आणि विधानसभा एकसोबत घेऊ, असं ते म्हणाले आहेत. आज भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

अमित शाह म्हणाले की, ''संपूर्ण देशात भाजप सरकार आल्यानंतर, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर समान नागरी संहिता लागू करण्यात येणार. संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकसोबत घेतल्या जातील.''

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकसोबत घेऊ: अमित शाह
Iran Israel War: इराणला युद्धाची खुमखुमी, इस्रायलवर डागली 200 क्षेपणास्त्र; युद्धाच्या भीतीनं जग हादरलं

पंतप्रधान मोदींनी देशाला बळकट करून दहशतवादापासून वाचवल्याचे शाह म्हणाले. ते म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने आपल्या 10 वर्षांच्या राजवटीत नक्षलवादाचा नायनाट केला आहे. मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामांबद्दल बोलताना त्यांनी कलम 370 रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि सर्जिकल स्ट्राईक यावरही बोलले.

ते म्हणाले की, "काँग्रेसने 70 वर्षांपासून राम मंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण केले. मात्र पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात (2019 मध्ये) राम मंदिराचे 'भूमीपूजन' आणि अभिषेक करण्यात आलं. रामनवमी 17 एप्रिल रोजी रामाचा जन्मदिवस आहे. पहिल्यांदाच राम लल्ला त्यांचा वाढदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहेत.

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकसोबत घेऊ: अमित शाह
Iran Israel War: इराणला युद्धाची खुमखुमी, इस्रायलवर डागली 200 क्षेपणास्त्र; युद्धाच्या भीतीनं जग हादरलं

शाह म्हणाले, केंद्रात सोनिया-मनमोहन सरकार असताना पाकिस्तानातून दहशतवादी भारतात यायचे. जेव्हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हा सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करण्यात आले. भाजपच्या 'संकल्प पत्र' (जाहिरनामा) संदर्भात ते म्हणाले, "मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आम्हीसमान नागरी संहिता लागू करू आणि एक राष्ट्र, एक निवडणूक सत्यात उतरवू.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com