PM Modi, Trump Discuss Bilateral Ties On Phone Call News 18
देश विदेश

Trump And Pm Modi Phone Call: जगात शांतता आणू ! दोन्ही मित्रांचा एकमेकांना शब्द; द्विपक्षीय संबंधांवर पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची फोनवर चर्चा

PM Modi, Trump Discuss Bilateral Ties On Phone Call: अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर एका आठवड्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Bharat Jadhav

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. या फोनवरील संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. याबरोबर त्यांनी जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी एकत्र काम करण्याच्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांनी जोर दिला.

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी फोनवर चर्चा करताना पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीसह जागतिक समस्यांवर विचार विनिमय केला. जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहून लवकरात लवकर भेट घेणार असल्याचं म्हटलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांनी पहिल्यांदाच चर्चा केली. पीएम मोदींनी सोमवारी संध्याकाळी एक्सवर पोस्ट करताना म्हणआले की, 'माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. त्यांच्या दुसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन. आम्ही परस्पर फायदेशीर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू. असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

दरम्यान अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींना एक अद्भुत व्यक्ती म्हटलं होतं आणि संपूर्ण जग त्यांच्यावर प्रेम करते असे म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी २० जानेवारी रोजी त्यांचे अभिनंदन केले होते. भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी आणि जगासाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी जवळून काम करण्याची उत्सुकताही मोदींनी व्यक्त केली होती.

एक्सवर पोस्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. तुम्हाला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा!” असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT