Lok Sabha Election 2024  Saam tv
देश विदेश

NDA Cabinet Ministers List: दिल्लीतून फोन फिरले, महायुतीच्या खासदारांची रिंग वाजली; मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी? नावं आली समोर...

Central Cabinet Minister Oath Ceremony: राजधानी दिल्लीमध्ये आज नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची लगबग सुरू आहे. राज्यासह देशातील विविध नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असून आज सायंकाळी हे सर्व नेते शपथ घेतील.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ९ जून २०२४

लोकसभा निवडणुकांनंतर आज देशात नवे सरकार स्थापन होणार आहे. एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. आजच्या शपथविधी सोहळ्यात विविध राज्यातील एनडीएमधील घटकपक्षांचे नेते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील. ज्याची यादी सध्या समोर आली आहे.

राज्यात कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?

राज्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज ते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर आज सकाळी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. तसेच भाजपच्या खासदार रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी, यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

एनडीएमधील घटक पक्षांनाही संधी

एनडीए सरकारमध्ये किंगमेकर ठरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या TDP पक्षाचे 2 खासदार शपथ आज शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये राममोहन नायडू कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर पेम्मासानी चंद्रशेखर हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सुद्धा नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेतील.

RLD प्रमुख जयंत चौधरी आणि अपना दलाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांनाही दिल्लीतून फोन आला आहे. हे दोन्ही नेते मोदींच्या मंत्रिमंडळात आज शपथ घेतील. त्याच बरोबर अर्जुनराम मेघवाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी, प्रल्हाद जोशी, भाजपचे खासदार सर्वानंद सोनेवाल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

तसेच मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही पुन्हा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान सकाळी 11.30 वाजता त्यांच्या NDA मधील मित्रपक्षांच्या नेत्यांची आणि संभाव्य मंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी भेट घेणार आहेत. फोन आलेले सर्व नेते यावेळी उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT