PM Modi receives Russia's prestigious civilian honour Saam Tv
देश विदेश

PM मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान, पुतीन यांनी 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'ने केलं सन्मानित

Order of St Andrew the Apostle: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहे. यातच आज पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'ने सन्मानित करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'ने सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना या सन्मानाने सन्मानित केले. पंतप्रधान मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत.

सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान मी भारताच्या जनतेला समर्पित करतो. हा सन्मान संपूर्ण भारताचा आहे. मोदी म्हणाले की, रशिया आणि भारताचे संबंध प्रत्येक दिशेने दृढ झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याबद्दल रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, ''हा दौरा प्रत्येक अर्थाने खूप यशस्वी झाला आहे. त्यांनी (पंतप्रधान मोदी आणि पुतिन) द्विपक्षीय अजेंडाच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, तसेच G20, BRICS, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये आमच्या सहकार्यावर चर्चा केली.''

लावरोव म्हणाले की, ''भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याच्या समर्थनार्थ आम्ही आवाज उठवला आहे. मला विश्वास आहे की, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील प्रत्येक क्षेत्रातील संबंधांमध्ये सकारात्मक परिमाण पाहायला मिळेल.

दरम्यान, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. 2022 मध्ये युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला रशिया दौरा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील तिन्ही मोठे धरणं भरले

Railway News : बाकी डबेसोडून रेल्वेचं इंजिन पळालं पुढे; रेल्वेचं कपलिंग अचानक तुटलं

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

SCROLL FOR NEXT