Maharashtra Rain News: रेड अॅलर्ट, शाळांना सुट्ट्या, पण अतिमुसळधार नाहीच! अंदाज चुकला? हवामान खात्याचं म्हणणं काय?

Maharashtra Weather News: हवामान विभागाने आज मुंबईसह अनेक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यानंतर शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र अतिमुसळधार पाऊस न झाल्याने हवामान विभागाचा अंदाज चुकला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
रेड अॅलर्ट, शाळांना सुट्ट्या, पण अतिमुसळधार नाहीच! अंदाज चुकला? हवामान खात्याचं म्हणणं काय?
Maharashtra Weather NewsSaam Tv

सचिन जाधव, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

राज्यात रविवार आणि सोमवारी पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. अतिवृष्टीचा परिणाम लोकल सेवेवरही झाला. मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

हवामान विभागाने आजही मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. म्हणून अनेक जिल्ह्यातील पालिकांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र आज अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचं दिसलं.

रेड अॅलर्ट, शाळांना सुट्ट्या, पण अतिमुसळधार नाहीच! अंदाज चुकला? हवामान खात्याचं म्हणणं काय?
VIDEO: अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स; विरोधकांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं रोखठोक उत्तर

यातच हवामान विभागाने रेड अलर्टचा अंदाज वर्तवल्याने अनेक जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र रेड अलर्टचा अंदाज वर्तवल्यानंतरही तसा पाऊस न झाल्याने हवामान विभागाचा अंदाज चुकला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. यावरच आता हवामान विभागाने आपलं म्हणणं मांडलं आहे.

हवामान विभागाने काय म्हटलं?

पुणे हवामान विभागाच्या संचालिका मेधा खोले म्हणाल्या आहेत की, ''कालचा रेड अलर्ट हा पुण्यासाठी नव्हता, कोकण विभाग आणि घाट विभाग याला रेड अलर्ट होता. अंदाज चुकला असं नाही. कोकणात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात 150 मिलिमीटर पाऊस झाला आहे. इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला.''

रेड अॅलर्ट, शाळांना सुट्ट्या, पण अतिमुसळधार नाहीच! अंदाज चुकला? हवामान खात्याचं म्हणणं काय?
Mihir Shah Arrested: मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात

त्या म्हणाल्या की, ''काल मुंबई आणि कोकणमध्ये पाऊस झाला. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होईल. पुढच्या तीन महिन्यात पाऊस वाढेल. प्रत्येक महिन्यात आता चांगल्या पाऊस होईल. उत्तरार्धात आता चांगल्या पाऊस होईल.'' मेधा खोले यांनी सांगितलं की, ''येत्या सहा ते सात दिवस कोकणात पाऊस चांगल्या राहील. सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे. मात्र मराठवाड्यात पाऊस कमी राहील. घाट माथ्यावर पाऊस चांगला राहील.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com