उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे. यातच त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली असून सोमवारी अनंत-राधिका यांचा संगीत कार्यक्रमात पार पडला. या संगीत कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींसह क्रिकेटर्स थिरकताना दिसले.
याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे देखील एका गाण्यावर ठेका धरताना दिसले. तेजस यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडिओवर आता विरोधक टीका करत आहेत. मात्र आता विरोधकांना तेजस यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
अनंत आणि राधिका यांच्या संगीत कार्यक्रमातील तेजस यांचा डान्सचा व्हिडिओ शेअर करत भाजप नेते आशिष शेलार टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''जो मराठी तरुण गोविंद रे गोपाळा म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत. जो होळीला आयना का बायना, म्हणताना कधी दिसला नाही. गणा धाव रे... मला पाव रे, म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींंच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला.''
X वर पोस्ट करत शेलार म्हणाले आहेत की, ''हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात धकधक झाले. हे नृत्य पण कसे जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक.. वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे संजयकाका महाराष्ट्राला पटवून देतीलच.''
आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''कोण विरोधक बोलताय, त्यांना माहिती नाही, ठाकरे आणि अंबानी कुटूंबाचे पारिवारिक संबंध आहेत. तीन पिढ्यापासून हे संबंध आहेत. अंबानी यांनी बिझनेस मुंबईत केला. पण ते गुजरातला पळून गेले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी यांचे जुने संबंध होते. त्यामुळे कुटुंबिक कार्यकामात काय होतं, यावर मी काय बोलायचं.'' ते म्हणले, ''(आशिष शेलार) त्यांना सायकॉलॉजीकल मदतीची गरज आहे. म्हणून त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. परिणाम होतो त्यांच्यावर.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.