Mihir Shah Arrested: मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात

Mihir Shah Arrested from Thane Shahpur: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक करण्यात आली आहे. अपघानंतर मिहीर हा फरार होता. वरळी पोलिसांनी त्याला शहापूरमधून अटक केली आहे.
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात
Mihir Shah Arrested from Thane ShahpurSaam Tv

सचिन गाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अपघानंतर मिहीर हा फरार होता. वरळी पोलिसांनी त्याला शहापूरमधून अटक केली आहे. मिहीरसह त्याला मदत करणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मिहीरची आई आणि बहीण यांनाही ताब्यात घेतलं आहे.

बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. ही कार मिहीरच चालवत होता, असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला होता. अपघातानंतर तो फरार होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी मिहीर याचे वडील राजेश शहा यांना पोलिसांनी अटक केली होती. ज्यांना सोमवारी जामीन मिळाला.

मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात
Manatralaya: मंत्रालयात खळबळ! फेऱ्या मारून कंटाळला, ५ व्या मजल्याच्या सज्जावर बसला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला केलं रेस्क्यू, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर मिहीर शहा याने सर्वातआधी त्याचे वडील राजेश शहा यांना फोन केला होता. यानंतर तो त्याच्या बोरिवली येथील घरी गेला, तिथे त्याची बहीण आली आणि यानंतर मिहीर कुठे गेला, हे कोणालाच माहित नव्हतं. पुढे पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली.

मिहीरला पळून जाण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. त्यानंतर त्यांना अटक करायची की नाही, याचा निर्णय हा नंतर घेतला जाईल. यातच पोलिसांनी आता जवळपास १२ जणांना ताब्यत घेतलं आहे.

मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात
VIDEO: विधानसभेसाठी अजित पवार गटाची मोठी खेळी, नरेश अरोरांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती

दरम्यान, मिहीरला पोलिसांनी शहापूर येथून ताब्यात घेतलं आहे. त्याला आता तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात आणण्यात येईल. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतर त्याला २४ तासांच्या आत शिवडी कोर्टात हजर केलं जाईल. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आणि मद्य पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com