Pm Modi On India vs Bharat row saam tv
देश विदेश

India vs Bharat Row: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, पंतप्रधान मोदींचे खासदारांना आदेश

Pm Modi On India vs Bharat row: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, पंतप्रधान मोदींचे खासदारांना आदेश

Satish Kengar

Pm Modi On India vs Bharat Row:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत 'इंडिया आणि भारत' वादावर बोलू नका, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिले आहेत. यासोबतच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर योग्य ती प्रतिक्रिया द्यावी आणि सनातन धर्माबाबत वस्तुस्थिती सांगावी, असे सांगितले आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत G-20 वर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बैठकीदरम्यान, G20 वर एक सादरीकरण देण्यात आले. ज्यामध्ये G-20 समितीमध्ये 2 दिवस होणार्‍या सर्व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

यावेळी सर्व मंत्र्यांना G-20 अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर परदेशी पाहुण्यांचं स्वागताची जबाबदारी सर्व केंद्रीय मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी 2 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. उदयनिधी म्हणाले होते, “सनातन धर्म जातीच्या आधारावर लोकांना विभाजित करतो. सनातन धर्माचा समूळ नाश हे खरे तर मानवता आणि समता राखण्याच्या हिताचे असेल.”

त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. यातच आज पंतप्रधान मोदी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर योग्य ती प्रतिक्रिया द्यावी आणि सनातन धर्माबाबत वस्तुस्थिती सांगावी, असं म्हटल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT