…म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो; केंद्राचे स्पष्टीकरण Saam Tv
देश विदेश

…म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पीएम मोदींचा फोटो; केंद्राचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कोरोना Corona प्रतिबंधक लस प्रमाणपत्रावर Vaccine Certificate छापण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या फोटोची जोरोदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. विरोधकांनी यावरुन केंद्र सरकारवर Central Government अनेक टीका देखील केली. कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो काय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र यावर आता खुद्द केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

जनजागृती करण्याचा हेतूने कोरोना प्रतिबंधक लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आणि त्यासोबतचा संदेश छापण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार Bharti Pawar यांनी ही माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी मंगळवारी संसदेमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर छापण्यात येणाऱ्या मोदींच्या फोटो संदर्भात प्रश्न विचारला होता. प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापणं गरजेचं आणि अनिवार्य आहे का? असा प्रश्न केतकर यांनी संसदेत विचारला होता. यावर आता आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिले आहे.

यामागे केवळ जनजागृती करण्याचा हेतू असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी कोरोना महामारी संदर्भातील नियम पाळावेत, हाच संदेश देण्यासाठी प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापण्यात आल्याचे भारती पवार यांनी सांगितले आहे.

लस घेतल्यानंतर देखील कोरोना या विषाणूचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नियम आणि अटी पाळणे गरजेचे आहे. करोनाला आळा घालायचा असल्यास नियमांचे पालन करणे हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्यासोबतच्या संदेशामधून जागृती केली जात आहे. हे सर्व व्यापक लोकहिताच्या दृष्टीने केले जात असल्याचे भारती पवार यांनी सांगितले आहे. अशाप्रकारचे महत्वाचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत ही सरकारची जबाबदारी आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार! डोनाल्ड यांच्या विजयाने भारतावर काय परिणाम होणार?

IND vs AUS: ना रोहित, ना विराट; BGT मध्ये हा भारतीय फलंदाज धावांचा पाऊस पाडणार, Ricky Ponting ची भविष्यवाणी

How to Wake Up Earlier: आयुष्यात यश हवं तर लवकर उठा; जाणून घ्या पहाटे ५ वाजता उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

SCROLL FOR NEXT