काेल्हापूर : कोरोनावर लस आली तरी औषध covid19 drug कधी येणार याची वाट सगळेच बघत होते. आता ही प्रतिक्षा संपण्याची चिन्ह आहेत. राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळामधील एक कंपनी हे औषध बाजारात आणेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आयसेरा बायोलॅाजिकल iSera Biological नामक कंपनी औषध बाजारात आणण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. सिरम इन्स्टीट्यूटच्या Serum Institute of India मदतीने तयार केल्या जात असलेल्या या औषधाच्या पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या सध्या सुरु आहेत. सौम्य आणि मध्यम संक्रमित रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त ठरेल असा दावा करण्यात येत आहे.
औषधच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये संक्रमित रुग्णांची RT-PCR चाचणी ७२ ते ९० तासांत निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मनुष्यावरील चाचणीचा टप्पा या महिन्याच्या अखेरीस पुर्ण हाेईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) सहकार्याने सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे चार वर्षांपुर्वी स्थापित झालेल्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनी जी प्रामुख्याने साप चावणे, रेबीज आणि डिप्थीरियासाठी अँटीसेरम उत्पादनाची निर्मिती करीत असते. या कंपनीने काेराेनावरील औषध निर्मीतीसाठी प्रयत्न केले आहेत. या कंपनीने एक कॉकटेल विकसित केले आहे. ज्यामुळे कोविड -१९ अँटीबॉडीज जे सौम्य किंवा मध्यम आजारी रुग्णाला दिली जाते. ज्यामुळे विषाणु शरीरात आणखी पसरण्यापासून रोखला जाताे आणि रुग्णाला दिलासा मिळताे.
ज्या तत्त्वांवर ही प्रक्रिया सुरु आहे ती अत्यंत काटेकाेर पद्धतीची आहे. सध्या आम्ही मानवी चाचण्यांच्या परिणामांची प्रतीक्षा करीत आहाेत. ते प्रभावी ठरले तर ते विशेषतः भारतासारख्या देशासाठी अतिशय योग्य औषध ठरले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रा. एन. के. गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय औषध उत्पादनांच्या तुलनेत हे एक अतिशय किफायतशिर दरातील औषध ठरेल असे नमूद केले.
कॉकटेलमध्ये अत्यंत विशिष्ट कोविड -१९ अँटीबॉडीज असतात, जी सर्व बाह्य रसायने काढून टाकण्यासाठी शुद्ध केली जातात. विषाणूपासून मिळवलेल्या विशिष्ट प्रतिजनांसह घोड्यांना इंजेक्शन देऊन अँटीबॉडीज तयार केल्या जातात. एसआयआय कोविड -१९ लस उत्पादक निर्मिती करत आहे त्यांनी योग्य प्रतिजन, रसायने जे संक्रमितांत प्रतिपिंडे तयार करण्यास प्रवृत्त करतात, निवडण्यात मदत केली आहे. अँटीबॉडीजच्या विकासासाठी घोड्यांची निवड केली गेली. याचे प्रमुख कारण म्हणजे जे मोठे प्राणी असतात ते मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करतात असे आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे संचालक नंदकुमार कदम यांनी सांगितले.
ही प्रक्रिया लस देण्यासारखीच आहे. घोड्यांना विशिष्ट अँटीजेन्सने इंजेक्शन दिले गेले जेणेकरून ते प्रतिपिंडे विकसित करू शकतील. कोविड -१९ विषाणूशी लढण्यासाठी मानवी शरीर जी प्रतिपिंडे बनवते तीच प्रतिपिंडे घाेडेही बनवतात. अँटीबॉडीज घोड्यांमधून काढली जातात आणि त्यानंतर अत्यंत उच्च-गुणवत्तेच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केली जाते जेणेकरून उत्पादनात किमान 95 टक्के शुद्ध प्रतिपिंडे असतात असेही कदम यांनी नमूद केले.
संक्रमित रूग्णांमध्ये कोविड -१९ ची विशिष्ट प्रतिपिंडे तयार करणे म्हणजे त्यांना रोगाशी लढण्यास मदत करणे हा एक दृष्टिकोन आहे ज्याचा आधी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला गेला आहे. प्लाझ्मा थेरपी ही एकेकाळी जीव रक्षक समजली जात हाेती. परंतु त्याचे संमिश्र परिणाम दिसून आले. पण एक महत्त्वाचा फरक आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये बरे झालेल्या रूग्णातून काढलेल्या रक्ताच्या प्लाझ्माची गुणवत्ता व्यक्तीपरत्वे भिन्न असते. तसेच, रक्ताच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज व्यतिरिक्त इतर अनेक रसायने असतात आणि यापैकी काही संक्रमित व्यक्तीमध्ये संभाव्य प्रतिकूल प्रतिक्रिया असू शकतात.
आयसेराचे हे औषध अत्यंत प्रभावी आहे. अँटीबॉडीज हे वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार दिल्यास त्याचे परिणाम दिसून येतील. स्विस येथील राेचे या फार्मास्युटिकल कंपनीने विकसित केलेल्या, अशाच "मोनोक्लोनल" उत्पादनांपेक्षा या आैषधाची मात्र जादा आहे. आयसेराचे उत्पादन, “पॉलीक्लोनल” अँटीबॉडी मिश्रण, मोनोक्लोनल पर्यायांच्या तुलनेत विषाणूला निष्प्रभावी करण्याची अधिक क्षमता आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते भविष्यात उदयास येणाऱ्या विषाणु आणि विद्यमान विषाणुांना राेखण्याचे काम करते.
आंतरराष्ट्रीय उत्पादनांपेक्षा कित्येक पटीने हे स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे. विषाणूने संक्रमित व्यक्तीच्या शरीराला पूर्णपणे जखडण्यापुर्वी त्याला उपचार मिळावा यासाठी त्यास औषध पुरवणे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये यातील फेज २ आणि फेज ३ हे दाेन्ही फेजच्या क्लिनिकल चाचण्या एकत्रित करण्याचे नियाेजन कंपनीने केले आहे. यामध्ये यश लाभल्यास वर्षाच्या अखेरीस बाजारात औषध उपलब्ध करण्याचा निश्चय असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.