FUEL PRICE HIKE IN INDIA  Saam Tv
देश विदेश

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल अन् LPG च्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांनी दिला इशारा

FUEL PRICE HIKE IN INDIA: भारतामध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Priya More
  • मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

  • गीता गोपीनाथ यांनी तेलाचे दर १४० डॉलरपर्यंत जाण्याचा इशारा दिला

  • भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी दरवाढ होण्याची शक्यता

  • तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आणि वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था हादरली आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगातील देश महागाईचा सामना करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. तसंच पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. अशामध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारताला एक गंभीर इशारा दिला. गीता गोपीनाथ यांच्या मते, हे युद्ध जूनपर्यंत सुरू राहिला तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० डॉलरपर्यंत पोहोचू शकते. असे झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती, महागाई आणि आर्थिक दबाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

मध्य पूर्वेतील देशांमधून भारत मोठ्याप्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील पुरवठ्यातील व्यत्ययाचा भारतावर परिणाम होत आहे. गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, हा फक्त महागड्या कच्च्या तेलाचा प्रश्न नाही तर आता पुरवठा होत नाही ही चिंताजनक बाब बनत आहे. तेल, एलपीजी, एलएनजी आणि खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो. जर पुरवठा साखळी खंडित झाली, तर ती पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागू शकतात.

गीता गोपीनाथ यांनी इशारा दिला की, सध्याच्या परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलरवरून १४० डॉलरपर्यंत वाढू शकतात. जर किमती वाढल्या तर भारतातील वाहतूक, उत्पादन आणि कृषी क्षेत्राचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील, ट्रकचे भाडे वाढेल आणि दैनंदिन वस्तूही महाग होतील.

गीता गोपीनाथ यांनी पुढे असे देखील सांगितले की, सरकार नागरिकांना कायम पूर्ण दिलासा देऊ शकणार नाही. सरकार काही भार उचलणार असले तरी जनतेला आणि कंपन्यांनाही किमतींचा काही परिणाम भोगावा लागेल. म्हणजेच भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात. आपण आता अशा काळात प्रवेश करत आहोत जिथे महागाई वाढतच राहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी डोळे देतात 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करू नका नाहीतर...

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर- सामान्य नागरिकांना त्रासदायक असणाऱ्या अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

Dahi Handi Safety Tips: दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी काय घ्यावी काळजी? सुरक्षिततेसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकींच्या खात्यात येणार ₹3,000? लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT