Speeding Thar accident in Danapur Patna Saam TV Marathi News
देश विदेश

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

Speeding Thar accident in Danapur Patna : बिहारच्या पाटणा शहरातील दानापूरमध्ये भरधाव थार कारने सहा जणांना चिरडले. अपघातानंतर संतप्त जमावाने कार पेटवली. चालक फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Speeding Thar accident in Danapur Patna : बिहारची राजधानी पाटणामधील दानापूरमध्ये थार कारचा भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या थार कारने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा अन् वाहनांना जोरदार धडक दिली. बुोधवारी रात्री हा अपघात घडला. गोला रोडवर भरधाव वेगात असणाऱ्या थार कारने रस्त्याने जाणाऱ्या सहा जणांचा चिरडले. या अपघातानंतर रोडवर एकच गोंधळ उडाला. संतप्त लोकांनी महागडी थार कार जाळून टाकली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून तपास केला जात आहे.

थारने धडक दिल्यानंतर अनेकजण गंभीर जखमी जाले. स्थानिकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. यामधील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने थार कारवरच कब्जा मिळवला. लोकांना कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर थार कार पेटवून दिली. या प्रकारानातंर परिस्थिती आणखी चिघळली.

आगीची माहिती मिळतात दानापूर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना रूग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता. आज सकाळपर्यंत परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक महागडी कार भरधाव वेगात जात होती. त्या कारने अनेक लोकांना चिरडले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलीसांनी या घटनेची नोंद केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झालाय. त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT