Parliament Winter Session 2023 Saam TV
देश विदेश

Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी मोठा निर्णय होण्याची शक्यता

Parliament Winter Session 2023 : इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीतीबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक पार पडणार आहे.

प्रविण वाकचौरे

New Delhi News :

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी संबोधित करतील.

आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे. 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IPC, CrPC आणि एव्हिडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत मांडत स्टॅडिंग कमिटीकडे पाठवलं होतं. अनेक मिटिंगनंतर 10 नोव्हेंबरला कमिटीनं आपला रिपोर्ट सादर केला होता.  (Latest Marathi News)

सोबतच मुख्य निवडणूक आयुक्त आणि बाकी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात देखील विधेयक मांडल जाणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीतीबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT