Parliament Smart Card Saam Tv
देश विदेश

Parliament Smart Card: संसदेत प्रवेश मिळण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; कार्ड बनवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Smart Card : देशातील संसदेत काही दिवसांपूर्वी स्मोक अॅटॅक झाला होता. त्यामुळे संसदेतील सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळेच आता सुरक्षेसाठी संसदेत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता स्मार्ट कार्डचा वापर करावा लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smart Card For parliament Entry:

देशातील संसदेत काही दिवसांपूर्वी स्मोक अॅटॅक झाला होता. त्यामुळे संसदेतील सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर आता सरकारने नवीन संसदेत कडेकोट सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. संसदेत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता स्मार्ट कार्डचा वापर करावा लागणार आहे.

संसदेत सध्या अर्थसंकल्पाचे कामकाज सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज पाहण्यासाठी स्मार्ट कार्डद्वारेच प्रवेश मिळणार आहे. यासाठी लोकांना बायोमॅट्रिक आणि फोटो द्यावा लागणार आहे. (Latest News)

संसदेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. यासाठी सर्वप्रथम नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर एक फॉर्म भरला जाणार आहे. त्यात आधार नंबर, पत्ता, मोबाईल नंबर भरावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म मंजुरीसाठी दिला जाणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचे बायोमॅट्रिक्स केले जाणार आहे आणि त्यांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. ज्या व्यक्तींकडे स्मार्ट कार्ड असेल त्यांनाच संसदेत प्रवेश मिळणार आहे.

संसदेच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी व्यक्तीला स्मार्ट कार्ड टॅप करावे लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीचे बायोमॅट्रिक चेक केले जाईल. त्यानंतरच संसदेचा दरवाजा उघडेल. परंतु जर एखाद्या व्यक्तीने संसदेतून बाहेर पडताना पास जमा केला नाही तर त्याचे नाव आपोआप ब्लॅक लिस्टमध्ये येईल. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा कधीच संसदेत प्रवेश मिळणार नाही.

१३ डिसेंबरला संसदेत स्मोक अॅटॅक झाला होता. संसदेत कामकाज सुरु असताना काही व्यक्तीने संसदेत धुर सोडला होता. त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट कार्डशिवाय कोणत्याही व्यक्तीला संसदेत प्रवेश मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रवींद्र चव्हाण नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांचे अभिनंदन करणार

BMC Election Result: मुंबईकरांनी शिंदेसेनेतील घराणेशाहीला नाकारलं, ठाकरेसेनेतील घराणेशाहीला पसंती

Surya-Shani Yuti: 30 वर्षांनंतर चमकणार या राशींचं नशीब; शनी-सूर्याच्या आशीर्वादाने मिळणार नुसता पैसा

अजित पवारांचे घड्याळ बंद पडले, शिंदेंच्या बेइमानीमुळे मुंबईत ‘अदानी’धार्जिणा महापौर, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Vatpachi Dal Recipe : सणासुदीला बनवा कोकण स्पेशल 'वाटपाची डाळ', जेवताना पाहुणे दोन घास जास्त खातील

SCROLL FOR NEXT