Parliament Monsoon Session kicks off with heated debates on Operation Sindoor, ceasefire, and war allegations — opposition and ruling party gear up for fiery exchanges. Saam TV News Marathi
देश विदेश

Parliament Monsoon Session : पावसाळी अधिवेशन वादळी होणार, युद्ध विरामावरून संसदेत रणसंग्राम होणार

Parliament Monsoon Session 2025 latest updates :पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. ऑपरेशन सिंदूर, युद्धविराम, ट्रम्प दावे, १९६२ युद्धावरून संसदेचा रणसंग्राम रंगणार. राहुल गांधींची मोदींवर टीका, तर भाजपने गांधी-नेहरू परिवारावर निशाणा साधला.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Rahul Gandhi vs PM Modi : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल. पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर, पहलगाम, युद्धविराम अन् ट्रम्प यांच्या दाव्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मोदी सरकारने संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केंद्र सरकार प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूर, युद्धविराम यांच्याबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही योग्य उत्तर दिलं जाईल, असे रिजिजू यांनी सांगितलं.

पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जातील. राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली जाईल. अधिवेशन सुरू असतानाच मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून अधिवेशन वादळी होणार असल्याचे असे चित्र आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २१ बैठका होणार आहेत. जनविश्वास सुधारणा विधेयक २०२५, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' आणि १९६२ च्या भारत-चीन युद्धावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात प्रश्न उपस्थित केलेत. '५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय?' असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. 'देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे,' असे म्हणत राहुल गांधींनी ट्रंप यांचा व्हिडीओ देखील शेअर केला.

तर दुसरीकडे, भाजपाचे निशिकांत दुबे यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धावरून गांधी आणि नेहरू परिवाराला लक्ष्य केले आहे. चीनविरुद्धच्या युद्धात नेहरूंचे नातलग ब्रज कौल सेनापती होते, असा दावा दुबेंनी केला. गांधी-नेहरूंच्या काळातील दलालीचा पर्दाफाश करणार असल्याचे दुबे म्हणाले. दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटना, दिल्लीच्या मद्रासी कँपमधे बुलडोझर इत्यादी बाबींवर सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं खासदार संजय सिंह म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

Horoscope Wednesday : ४ राशींसाठी बुधवार जाणार खास, वाचा संपूर्ण राशीभविष्य

Manoj jarange patil protest live updates: आमचे साहेब संकटमोचक ठरले_शिर्डीत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष_फटाके फोडून पेढे वाटले

Sleep Paralysis: स्वप्नात ओरडूनही आवाज का येत नाही? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Laxman Hake : शासनाला GR काढायचा अधिकार नाही, उपाययोजना ओबीसी आरक्षण संपवणारी; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT