Santa Claus News Saam tv
देश विदेश

Santa Claus : शाळेत सांताक्लॉजवर बंदी? सांताक्लॉजविनाच आता ख्रिसमस पार्टी,VIDEO

Santa Claus Latest News in Marathi : यंदा नाताळमध्ये लहान मुलांचं आकर्षण असलेला सांताक्लॉज गायब होण्याची शक्यता आहे. कारण शाळेत लहान मुलांना सांताक्लॉज करण्यावर निर्बंध घालण्यात आले. नेमके काय निर्बंध आहेत आणि कुठे पाहुया..

Saam Tv

नाताळ आता सांताक्लॉज शिवाय साजरा होणार आहे. शाळेत नाताळ पार्टीत आता विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्याऱ्यावर प्रशासनानं कडक निर्बंध आणलेत. त्यामुळे शाळेतील नाताळ आता सांताक्लॉज शिवाय साजरा होण्याची शक्यता आहे. यानिर्णयानं लहानग्यांच्या आठवणीतील सांताक्लॉज लवकरच संपुष्टात येण्याची शक्यताय.. कारण शाळेत विद्यार्थ्यांमधूनच सांताक्लॉज बनवत नाताळ साजरा होतो आणि नेमकं हेच हेरून आता सरसरकट कोणाही विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवता येणार नाही. काय नेमके नियम बनवण्यात आलेत पाहुया..

'सांताक्लॉज'साठी परवानगी लागणार

विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवल्यास शाळांवर कारवाई होणार

विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक

अप्रिय परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश

कोणताही वाद झाल्यास शाळांवर कारवाई होणार

या निर्णयानं विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यासाठी आधी शाळेला पालकांची परवानगी घ्यावी लागेल. सांताक्लॉज म्हणजे काय ते देखील पाहुया.

सांताक्लॉज म्हणजे काय?

सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा

सांताक्लॉजचा पवित्र बायबल या धर्मग्रंथात उल्लेख नाही.

ख्रिश्चन संस्कृतीत चांगली वर्तणूक असलेल्या मुलांना सांताक्लॉज गिफ्ट देतो

ख्रिसमस सुरु होण्याआधी भेटवस्तू देण्याची परंपरा

केवळ पश्चिमात्य संस्कृतीला विरोध म्हणून जर सांताक्लॉजला विरोध होत असेल तर ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. सांता नको संत बनवा अशा उथळ पोस्टही सध्या व्हायरल होत आहेत. कोणताही सण असो तो आनंद देणाराच असतो...त्यामुळे त्याला धर्माचं टॅग चिटकवून नको ते वाद निर्माण करणं भारतासारख्या विविध धर्म आणि जातींनी नटलेल्या देशात नक्कीच शोभनीय नाही. मात्र तुम्ही काळजी करु नका कारण हा निर्णय मध्यप्रदेशमध्ये झाला असून अजूनतरी महाराष्ट्रात सांतावरून कुठलाही वाद नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT