Indian students in Canada in panic: कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीची लाट; धडाधड ईमेल आल्यानं विद्यार्थी चितिंत

Indian students in Canada being asked to resubmit documents: जस्टिन ट्रुडो नेहमी भारत किंवा कॅनडा स्थायिक भारतीयांविरूद्ध निर्णय घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी घेतलेला निर्णय कॅनडास्थित भारतीयांची धाकधूक वाढवणारी ठरली आहे.
Indian Students in Canada
Indian Students In CanadaSaam tv
Published On

भारत आणि कॅनडामधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जस्टिन ट्रुडो नेहमी भारत किंवा कॅनडा स्थायिक भारतीयांविरूद्ध निर्णय घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी घेतलेला निर्णय कॅनडास्थित भारतीय विद्यार्थ्यांची धाकधूक वाढवणारी ठरली आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारतातील विद्यार्थ्यांसह इतर परदेशी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळं कॅनडामध्ये राहत असलेल्या भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कॅनडात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी सध्या ट्रुडो सरकारने घेतलेल्या निर्णयावरून चिंतित आहेत. कॅनडात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून एक मेल प्राप्त झालाय. ज्यामध्ये त्यांना स्टडी परमिट, व्हिसा कागदपत्रांसह त्यांच्या शिक्षणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड आणण्यास सांगितलं आहे.

हा मेल इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा(IRCC), कॅनडाच्या परदेशी विद्यार्थ्यांशी व्यवहार करणाऱ्या सरकारी विभागाकडून पाठवण्यात आलं आहे. कॅनडाने परदेशी विद्यार्थ्यांविरूद्ध घेतलेल्या पावलामुळं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच ज्यांच्याकडे व्हिसा कागदपत्रे पुढील दोन वर्षांसाठी वैध आहेत. अशा नोंदी आणण्यासही त्यांना सांगण्यात आलं आहे.

Indian Students in Canada
Indian Students Abroad: चिंताजनक! परदेशात 5 वर्षांत 633 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॅनडामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

यापूर्वीही कॅनडाकडून एक निर्णय घेण्यात आला होता. ज्यात परदेशी विद्यार्थ्यांबाबात आपले धोरण कडक करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांर अटी आणि शर्तींमध्ये मर्यादा लावण्यात येणार आहे. हैदराबादमधील पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेणारे विद्यार्थी अविनाश कौशिक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितलं की, 'मला जेव्हा ई- मेल मिळाला तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. माझा व्हिसा २०२६ पर्यंत वैध आहे. तरीही मला माझी सर्व कागदपत्रे पुन्हा सबमिट करण्यास सांगितलं आहे. अटेंडेंस, मार्कशीट आणि आम्ही जिथे काम करत आहोत, तेथील कागदपत्रे त्यांना हवे आहेत.'

Indian Students in Canada
Canada Viral Video: भयंकर वास्तव... चक्क वेटरच्या नोकरीसाठी हजारोंच्या रांगा, कॅनडामधील भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल

कॅनडामध्ये किती भारतीय विद्यार्थी आहेत?

यापुर्वी पंजाबमधील विद्यार्थ्यांना असा ई-मेल आला होता. काही विद्यार्थ्यांना आयआरसीसी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्यासही सांगण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ४.२ लाख आहे. तर, अमेरिकेत ३.३ लाख भारतीय विद्यार्थी आहेत. मात्र, अचानक आलेल्या ई-मेलमुळं कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com