Panchkula Shock Saam
देश विदेश

Panchkula: एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..

Panchkula Shock: देहरादून येथील प्रवीण मित्तल आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवलं असल्याचा अंदाज.

Bhagyashree Kamble

हरियाणातील पंचकुला शहरातील सेक्टर २७ मध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबातील ७ जणांनी वाहनातच बसून विष प्राशन केलं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना गाडीतच सुसाईड नोट सापडली. त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवत असल्याचं उल्लेख केलेला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मृतांमध्ये देहरादूनमधील रहिवासी प्रवीण मित्तल (४२), त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुले (दोन मुली आणि एक मुलगा) यांचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब आधी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. देहरादूनहून ते पंचकुलात गेले होते. कथा ऐकून परतल्यानंतर त्यांनी कारमध्येच सुसाईड केली.

प्राथमिक तपासात पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्येचे कारण आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणा असल्याचे नमूद केले आहे.प्रवीण मित्तल हे टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात होते, आणि व्यवसायातील तोट्यामुळे कुटुंबावर मोठे कर्ज झाले होते. या आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेसंदर्भात पंचकुला येथील डीसीपी हिमधरी कौशिक म्हणतात, 'आम्हाला एका गाडीत कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह सापडले. माहिती मिळताच त्यांना ओजस रूग्णलयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून, तपास सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT