Manasvi Choudhary
रवा हा विविध चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. रव्यापासून तुम्ही घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवू शकता.
रव्यामध्ये दही, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून हे मिश्रण तव्यावर डोशासारखे पसरवून तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत रवा चिला तयार करू शकता.
रवा ढोकळा ही अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. रवा आणि दह्याचे मिश्रण एकत्र करून त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून तो वाफेवर शिजवून घ्या. रव्याचा मऊ आणि लुसलुशीत ढोकळा तयार होईल. ढोकळा पचनासाठी अतिशय हलका असतो.
रवा उपमा हा सकाळचा चविष्ट आणि हलका नाश्ता आहे. कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे मिक्स करून बनवलेला उपमा चवदार लागतो.
रवा आणि दह्याचे मिश्रण एकत्र करून अवघ्या १५ मिनिटांत मऊ आणि पांढरीशुभ्र इडली तयार होते. ही इडली ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत चविष्ट लागते.
काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाल्यास रवा शिरा ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. साजूक तुपात बनवलेला रवा अत्यंत चविष्ट लागतो.