Manasvi Choudhary
हॉटेलमध्ये चमचमीत, लज्जतदार पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर शेवटी बडीशेप आणि खडीसाखर देतात हे तुम्ही देखील पाहिलच असेल.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बडीशेप का देतात? यामागचं कारण या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेकजण याला माऊथ फ्रेशनर म्हणतात मात्र यामागे आरोग्यदायी कारण दडलेलं आहे. ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
हॉटेलमधील पदार्थ हे तेलकट, तिखट आणि मसालेदार असतात जे पचायलाही जड असतात यामुळे जेवण केल्यानंतर सुस्ती, झोप येते मात्र बडीशेप खाल्ल्याने फ्रेश वाटते.
हॉटेलमधील पदार्थांच्या सेवनाने पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.बडीशेपमध्ये खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अन्न पदार्थ लवकर पचतात.
बडीशेप खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस किंवा छातीत जळजळ होणे या समस्यांपासून आराम मिळतो.
हॉटेलमधील व्हेज- नॉनव्हेज मसालेदार पदार्थाचे सेवन केल्याने तोंडातून एक विशिष्ट वास येतो मात्र बडीशेपचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.