Pune : हृदयद्रावक! आईचा हार्टअटॅकने मृत्यू, २४ तासाच्या आत मुलाने संपवलं जीवन

Pune News : पुण्यातील अत्यंत हृदयद्रावक घटनेत आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. एकाच दिवशी मायलेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
PUNE TRAGEDY: SON DIES BY SUICIDE HOURS AFTER MOTHER'S DEATH, MOTHER AND SON PASS AWAY ON SAME DAY
PUNE TRAGEDY: SON DIES BY SUICIDE HOURS AFTER MOTHER'S DEATH, MOTHER AND SON PASS AWAY ON SAME DAYSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात हृदयद्रावक घटना

  • आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • एकाच दिवशी मायलेकांचा मृत्यू

  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पुण्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या अचानक जाण्याचा धक्का आणि एकटेपणातून मुलाने आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच दिवशी मायलेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंदा दोडके (वय ५०) आणि त्यांचा मुलगा साहिल गणेश दोडके (वय २५,) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच दोडके कुटुंब या परिसरात राहण्यासाठी आले होते. मंदा दोडके या वृद्ध रुग्णांची सेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याला चार मोठ्या बहिणी आहेत.साहिल कष्टाळू स्वभावाचा होता. तो पहाटे लवकर उठून घराघरांत दूध पोहोचवण्याचे काम करत असे. याशिवाय लिफ्ट दुरुस्तीची कामे करून तो कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. प्रतिकूल परिस्थितीतही त्याने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती.

PUNE TRAGEDY: SON DIES BY SUICIDE HOURS AFTER MOTHER'S DEATH, MOTHER AND SON PASS AWAY ON SAME DAY
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

दरम्यान, गुरुवारी पहाटे मंदा दोडके यांना अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. त्यानंतर साहिलने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आईच्या मृत्यूची बातमी ऐकताच साहिल पूर्णपणे खचून गेला. आईला वाचवू न शकल्याची खंत आणि अचानक आलेल्या एकाकीपणाच्या भावनेतून त्याने घरी परतत टोकाचे पाऊल उचलले. घरातील पंख्याला साडी बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

PUNE TRAGEDY: SON DIES BY SUICIDE HOURS AFTER MOTHER'S DEATH, MOTHER AND SON PASS AWAY ON SAME DAY
Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

सकाळी नातेवाईकांनी दरवाजा उघडण्यासाठी साहिलला हाक मारली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी घरात पाहिले असता साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वैकुंठ स्मशानभूमीत मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com