Pamban Bridge Inauguration News 
देश विदेश

Pamban Bridge : नरेंद्र मोदींच्या हस्ते पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन, भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज

Pamban Bridge News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम नवमीच्या निमित्ताने भारताचा पहिला उर्ध्व समुद्री पूल – पंबन रेल्वे पूल – याचे उद्घाटन केले. या पुलामुळे रामेश्वरमला जाणारा मार्ग सुलभ झाला असून पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Pamban Bridge Inauguration News : राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू येथील नव्या पंबन रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. पंबन रेल्वे पूल हा भारताचा पहिला उर्ध्व समुद्री पूल (व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज) आहे. हा पूल भारताच्या मुख्य भूभागाला पंबन बेटाशी जोडेल, ज्यामुळे रामेश्वरमचा प्रवास आता अधिक सुलभ होईल.

पंबन पुलाच्या उद्घाटनामुळे रामेश्वरम आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. रामायणातल्या दाखल्यानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते, त्यामुळे या पुलाला एक सखोल सांस्कृतिक महत्त्व आहे.पंबन पूल हा १९१४ मध्ये बांधलेला आहे. मागील १०० वर्षांपासून अखंडित सुरू होता. २०२२ मध्ये समुद्री क्षरणामुळे (marine erosion) बंद करण्यात आला होता. त्याच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.

पंबन पुलाची वैशिष्ट्य काय? -

रामेश्वरम द्विपला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकीचा उत्तम नमुणा आहे. ५५० कोटी रुपये खर्च या पुलाच्या बांधकामासाठी लागला आहे. या पुलाची लांबी 2 पूर्णांक 8 किलोमीटर आहे, 99 स्पॅन इतका विस्तार असून 72 पूर्णांक 5 मीटर उर्ध्व विस्तार आहे. 17 मीटर उंचीपर्यंत वर उचलण्याची क्षमता असल्याने रेल्वे आणि जहाजांची ये -जा सहज होऊ शकणार आहे. पोलादी बळकटीकरण, उच्च-दर्जाचे संरक्षणात्मक रंग आणि पूर्णपणे जोडणीसह बांधलेला असल्याने पुलाचा टिकाऊपणात अधिक वाढ होणार आहे. सागरी वातावरणाचा विचार करून या पुलाला पॉलीसिलोक्सेन कोटिंग केलेली असून ज्यामुळे त्याचे गंजण्यापासून रक्षण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT