PM Narendra Modi : तुम्ही मृत्यूला घाबरता का? PM नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं

PM Narendra Modi latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना मुलाखत दिली. यावेळी मोदींनी जगातील सर्व विषयांवर भाष्य केलं.
narendra modi News
narendra modi Saam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्ट झाला. पॉडकास्ट तब्बल सव्वा तीन तासांचा आहे. पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींवर भाष्य कें. पंतप्रधान मोदींनी लहानपणीचा अनुभव सांगितला. यावेळी देशातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. तुम्ही मृत्यूला घाबरता का, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं.

narendra modi News
Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! अचानक लागलेल्या आगीत ५१ जणांचा होरपळून मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

अमेरिकेचा पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅनने नरेंद्र मोदींना अनेक प्रश्न विचारले. 'तुम्ही मृत्यूवर विचार करता का, तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का, यावर मोदींनी हसत हसत उत्तर दिलं. मी तुम्हाला या प्रश्नाच्या बदल्यात एक प्रश्न करू शकतो? जन्मानंतर जीवन आणि मृत्यू दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु दोघांमध्ये कोणती घटना निश्चित आहे? त्यानंतर स्वत:च मृत्यू उत्तर दिलं. ज्या व्यक्तीचा जन्म होतो, त्यांचा मृत्यू निश्चित असतो'.

narendra modi News
Jhatka vs Halal : झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; रामदास आठवलेंनी कोणाला दिला सल्ला?

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, 'जे निश्चित आहे, त्याची भीती कसली? संपूर्ण वेळ जीवनावर खर्च करा. तुम्ही मृत्यूचा विचार करू नका. या पद्धतीने जीवनाचा विकास होईल. तसेच समृद्धी मिळेल. यासाठी मेहनत करावी लागेल. तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. मृत्यूआधी जीवनाचा उद्देश पूर्ण होईल. मृत्यूच्या भीतीला घाबरू नये. मृत्यू येणारच आहे, तर तो कधी येणार, त्याची चिंता करून फायदा नाही. जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा येईल'.

narendra modi News
Beed Crime : जालन्यातून बीडला पोहोचला, पण पुन्हा परतलाच नाही; विकास बनसोडे हत्याकांडाची धक्कादायक माहिती समोर

पंतप्रधान मोदींना आणखी प्रश्न विचारण्यात आला. 'भविष्याविषयी तुमच्या काय अपेक्षा आहेत. फक्त भारत नाही, संपूर्ण मानवसृष्टीचं पृथ्वीवर काय भविष्य आहे? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी स्वभावाने आशावादी आहे. माझ्याजवळ निराशावाद आणि नकारात्मकता नाही. माझ्या डोक्यात हा विचार येत नाही. मी विश्वास ठेवतो की, 'आपण मानवसृष्टीचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल, अनेक संकटावर मात केली आहे. आपण वेळेनुसार बदल केला आहे. प्रत्येक युगात मानवाचा नवीन बाबी स्वीकारण्याचा स्वभाव आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com