Farmer Death: सहा कारणांमुळे २७०६ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं; मागील वर्षी 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

Maharashtra Farmer Death : मागील वर्षात राज्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Maharashtra  Farmer Death
Farmer DeathFarmer Death
Published On

राज्यात मागील वर्षात २ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात विदर्भ आणि मराठवाड्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. विधान परिषदेत आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरींसह इतर सदस्यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत प्रश्न केला होता. त्या प्रश्नाला उत्तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिलंय.

Maharashtra  Farmer Death
Sharad Pawar: सत्तेच्या गैरवापरामुळे बीडमधील परिस्थिती खराब; धनंजय मुंडे शरद पवार यांच्या निशाण्यावर

मंत्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,अमरावती विभागामध्ये १,०६९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

Maharashtra  Farmer Death
Vijay Wadettiwar: राणेंचे जुने व्हिडिओ काढा, मटण कसं दाबून खातात ते पाहा; विजय वडेट्टीवारांचा टोला

अशी आहे आकडेवारी

बीड जिल्ह्यात २०५

अमरावती- २००

अकोला- १६८

वर्धा-११२

या २७०६ प्रकरणांपैकी १,५६३ प्रकरणे पात्र ठरली आहेत. यातील १,१०१ शेतकऱ्यांच्या वारसांना चेकद्वारे ३० हजार आणि बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमधून ७० हजार रुपये, अशी १ लाखांची रक्कम दिल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

काही प्रकरणांची चौकशी प्रलंबित

आत्महत्या केलेल्या काही प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग (१६७),अमरावती विभाग (१७२), बीड जिल्हा (१४), अमरावती जिल्हा (२९), अकोला जिल्हा (३४) आणि वर्धा जिल्हा (३) हे प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील वर्षात अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्या यासर्व पात्र प्रकरणांना निधी देण्यात आलाय. अमरावती विभागात

युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ गावातील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक दिवसापूर्वी घडली होती. या शेतकऱ्याने तीन पानांची सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण सांगितलं होतं. युवा शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com