Beed Crime : जालन्यातून बीडला पोहोचला, पण पुन्हा परतलाच नाही; विकास बनसोडे हत्याकांडाची धक्कादायक माहिती समोर

Beed Crime News : विकास बनसोडे हत्याकांडाने बीड हादरलं आहे. विकास बनसोडे हत्याकांडाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकासच्या भावाने घटनेविषयी माहिती दिली.
beed
beed News Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड पुन्हा एकदा हत्याकांडाच्या घटनेने हादरलं आहे. बीडच्या आष्टीतील पिंपरी घुमरीत प्रेम प्रकरणातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील तरुण हा आष्टीत ट्रक ड्रायव्हरचं काम करत होता. भाऊसाहेब क्षीरसागरसहित सात जणांच्या अमानुष मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विकास बनसोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे प्रेम प्रकरणातून युवकाला बेदम अमानुष मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाला आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे दोन दिवस झाडाला डांबून मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. युवक जालना जिल्ह्यातील असून त्याचे नाव विकास बनसोडे असं आहे. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब शिरसागरच्या ट्रक वर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मात्र त्याची भाऊसाहेब क्षीरसागर आणि इतर सात लोकांनी अमानुष मारहाण करून हत्या केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हानकुडे यांनी दिली आहे.

विकास बनसोडेच्या भावाने काय सांगितलं?

विकास बनसोडेचा भाऊ आकाश बनसोडेने पोलिसांत जबाब नोंदवला. या जबाबात आकाश बनसोडेने म्हटलं की, 'माझा भाऊ विकास बनसोडे २०१८ साली पिंपरी घुमरीमध्ये भाऊसाहेब क्षीरसागरकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो २० फेब्रुवारी २०२५ रोजी जालन्याला घरी आला. त्यानंतर १२ मार्चला पुन्हा होळीसाठी मालकाच्या बोलावण्यावरून आष्टीला गेला. आष्टीला जाताना सांगून गेला'.

beed
Crime News : सणाला गालबोट! दोन गटात जोरदार राडा; वाद सोडवायला गेलेल्या पोलिसाची हत्या

'१५ मार्च रोजी क्षीरसागरचा दुपारी फोन आला. त्याने आई-वडील आणि नातेवाईकांना घेऊन ये. त्यानंतर विकासला घेऊन जा असे सांगितले. विकासला घेऊन जायचे नसल्यास आमच्या पद्धतीने त्याचे काय करायचे ते करतो. काय झालं विचारल्यावर, आष्टीत आल्यावर सांगतो, असं क्षीरसागरने सांगितलं. त्यानंतर विकाससोबत काम करणाऱ्या मित्रांना फोन विचारलं. त्यावेळी त्याने मी आणि विकास दोघे मालकाच्या घरी अससल्याचे सांगितले,असे आकाशने सांगितले.

beed
Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! अचानक लागलेल्या आगीत ५१ जणांचा होरपळून मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

'विकास आणि भाऊसाहेबाच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांना घरासमोरील पत्राच्या शेडमध्ये ठेवल्याचे विकासच्या मित्राने सांगितले. स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर यांचे मोठे दाजी, सुशांत शिंदे, बापुराव शिंदे यांनी दोघांना बांधून ठेवलं. त्यांना दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. महिलांनी शिवीगाळ केली, असेही त्याने जबाबात पुढे सांगितले.

beed
Jhatka vs Halal : झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; रामदास आठवलेंनी कोणाला दिला सल्ला?

'आम्ही भाऊसाहेबाच्या घरी गेलो. त्यावेळी विकासच्या पोटात दुखत आहे. त्याला सरकारी दवाखान्यात दाखल केल्याचं सांगण्यात आल. त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो. आम्ही भाऊसाहेबाला फोन केला. त्यावेळी त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर भाऊसाहेबचा भाऊ बाबासाहेबाला कॉल केला. त्यावेळी विकासला शासकीय रुग्णालयात टाकल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर बाबासाहेबाने फोन बंद केला, असे आकाशने पुढे सांगितले.

'मी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना विचारले. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, गाडीमध्ये २ जण येऊन विकासला दवाखान्यात दाखल करून नाव गाव न सांगता लगेच निघून गेले. डॉक्टरांनी विकासची तपासणी केली, त्यावेळी त्यांनी विकासला मृत घोषित केले., असे आकाशने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com