पराग ढोबळे
नागपूर : नागपुरात ॲपल कंपनीच्या नावावर डुप्लिकेट वस्तू विक्री केली जात होती. या वस्तू विक्री करण्यासाठी चक्क गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहचला. त्याच्या जवळ असलेल्या सर्व वस्तू अँपल कंपनीच्या असल्याचा दावा त्याने केला. मात्र याबाबत अधिक चौकशी केली असता सत्य समोर आले असून पोलीस स्टेशनमध्ये विक्री करण्यासाठी गेला असता तो पोलिसांच्या ताब्यात अडकला.
नागपुरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ॲपल कंपनीचे डुप्लिकेट मोबाईल असेसरिस चक्क पोलिसानाच विक्री करण्याचा प्रयत्नात असताना एकाला अटक केली. या तपासात तिघा आरोपींना ताब्यात घेत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमुद्दीन निजामखान सैफीया तसेच इतर दोन सहकारी यात नईम नूर मोहम्मद खान मलिक आणि मोहसीन शैकीन अहमद मलिक अस अटक केल्या आरोपीचं नाव आहे.
विक्रीसाठी गेले व अडकला
गुन्हे शाखेच्या कार्यालयात १० मार्चला आरोपी जमुद्दीन निजामखान सैफी नावाचा व्यक्ती काही बनावट एअरपॉड आणि ॲपल कंपनीच्या ब्रँडची काही घड्याळे विकण्यासाठी आला होता. दरम्यान जमुद्दीन हा २६ हजार रुपयांचे एअरपॉड्स अवघ्या २६०० रुपयांत आणि ४० हजार रुपये किमतीचे ॲपलचे घड्याळ चार हजार रुपयांना विकत होते. हे विक्री करण्यासाठी पोलिसात गेला. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
सर्व वस्तू डुप्लिकेट
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा सर्व माल कस्टमने जप्त केला असून तो घरोघरी जाऊन लोकांना कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले. मात्र विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू डुप्लिकेट असल्याचा संशय गुन्हे शाखेच्या पथकाला आला. त्यामुळे संबंधितांची कसून चौकशी केली असता आणखी दोन साथीदार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर अँपल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून वस्तू डुप्लिकेट असल्याची खात्री झाली. यानंतर एअरपॉड्स प्रो वायरलेस चार्जिंग केसचे १६७ नग आणि सीरीज ९ वॉचचे १३ अशा ॲपल कंपनीची सुमारे ५० लाख रुपयांची बनावट वस्तू जप्त केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.